शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आणखी चार जणांची आमदारकी रद्द करा, शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 13:50 IST

Shiv Sena : आमदार सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमूलकर आणि रमेश बोरनारे यांच्या विरोधात देखील शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. 

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर १२ आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने गुरुवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. शिवसेनेने बोलाविलेल्या बैठकीला हे सदस्य उपस्थित नसल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यानंतर आज आणखी चार आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. आमदार सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमूलकर आणि रमेश बोरनारे यांच्या विरोधात देखील शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. 

सदा सरवणकर हे मुंबईच्या माहिम मतदारसंघातून विधानसभा आमदार आहेत. ते दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलताना दिसले होते. नंतर ते एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले. तर प्रकाश आबिटकर हे कोल्हापूरच्या राधानगरी मतदारसंघातून आमदार आहेत. संजय रायमूलकर हे बुलढाण्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडून गेले आहेत, तर रमेश बोरनारे औरंगाबादच्या वैजापूर मतदारसंघाचे आमदार आहेत. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. शिवसेनेला खिंडार पाडत एकनाथ शिंदे यांनी ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. यामुळे शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यात येत आहे. शिवसेनेने काल १२ आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे, असे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवले होते. आता सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमूलकर आणि रमेश बोरनारे यांचे देखिल सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. 

शिवसेनेकडून सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आलेले आमदार...  १) एकनाथ शिंदे, २) अब्दुल सत्तार, ३) संदीपान भुमरे, ४) प्रकाश सुर्वे, ५) तानाजी सावंत, ६) महेश शिंदे, ७) अनिल बाबर, ८) यामिनी जाधव, ९) संजय शिरसाट, १०) भरत गोगावले, ११) बालाजी किणीकर, १२) लता सोनावणे, १३) सदा सरवणकर, १४) प्रकाश आबिटकर, १५) संजय रायमूलकर, १६) रमेश बोरनारे. 

एकनाथ शिंदेंसोबत असलेले शिवसेनेचे आमदार१) एकनाथ शिंदे २) अनिल बाबर ३) शंभूराजे देसाई ४) महेश शिंदे ५) शहाजी पाटील ६) महेंद्र थोरवे, ७) भरत गोगावले ८) महेंद्र दळवी, ९) प्रकाश आबिटकर १०) डॉ. बालाजी किणीकर ११) ज्ञानराज चौगुले १२) प्रा. रमेश बोरनारे १३) तानाजी सावंत १४) संदीपान भुमरे १५) अब्दुल सत्तार १६) प्रकाश सुर्वे १७) बालाजी कल्याणकर १८) संजय शिरसाठ १९) प्रदीप जयस्वाल २०) संजय रायमुलकर २१) संजय गायकवाड २२) विश्वनाथ भोईर २३) शांताराम मोरे २४) श्रीनिवास वनगा २५) किशोर पाटील २६) सुहास कांदे २७) चिमणराव पाटील २८) लता सोनावणे २९) प्रताप सरनाईक ३०) यामिनी जाधव ३१) योगेश कदम ३२) गुलाबराव पाटील ३३) मंगेश कुडाळकर ३४) सदा सरवणकर ३५) दीपक केसरकर ३६) दादा भुसे ३७) संजय राठोड.

अपक्ष व लहान पक्षांचे आमदार१) बच्चू कडू २) राजकुमार पटेल ३) राजेंद्र यड्रावकर ४) चंद्रकांत पाटील ५) नरेंद्र भोंडेकर ६) मंजुळा गावित

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण