सहा मजली बेकायदा इमारतीची कारवाई वादग्रस्त; अधिकाऱ्यांनी लाखो रुपये उकळल्याचा बिल्डरचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 07:26 PM2021-09-06T19:26:49+5:302021-09-06T19:27:21+5:30

दावडी येथील सहा मजली बेकायदा इमारतीवर कारवाई न करण्यासाठी बिल्डरकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप बिल्डरने केला आहे.

the action of the six story illegal building is controversial | सहा मजली बेकायदा इमारतीची कारवाई वादग्रस्त; अधिकाऱ्यांनी लाखो रुपये उकळल्याचा बिल्डरचा आरोप

सहा मजली बेकायदा इमारतीची कारवाई वादग्रस्त; अधिकाऱ्यांनी लाखो रुपये उकळल्याचा बिल्डरचा आरोप

Next

कल्याण-दावडी येथील सहा मजली बेकायदा इमारतीवर कारवाई न करण्यासाठी बिल्डरकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप बिल्डरने केला आहे. त्यामुळे ही कारवाई वादाच्या भोव:यात सापडली आहे. या प्रकरणातील बिल्डर आणि अधिका:यांच्या हॉटेलमधील भेटीचा सीसीटीव्ही बिल्डरने समोर आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्तांनी दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. 

दावडी येथील डीपी रस्त्याच्या परिसरात सहा मजली बेकायदा इमारतीवर महापालिका प्रशासनाने चार दिवसापूर्वी कारवाई केली. या इमारतीचे बिल्डर मुन्ना सिंग यांनी आरोप केला आहे की, इमारतीवर कारवाई न करण्यासाठी अधिका:यांनी त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले आहेत. कारवाई पूर्वी अधिकारी अनंत कदम आणि दीपक शिंदे यांची एका हॉटलमध्ये बैठक झाली. या अधिका:यांनी आयुक्तांचे नावानेही पैसे घेतले आहेत. 

बिल्डरने केलेल्या गंभीर आरोपा संदर्भात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितेल की, या प्रकरणाची तक्रार माङयाकडे प्राप्त झालेली नाही. मात्र हा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणात चौकशी करुन दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर महापालिकेचे बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाई करणारे खाते पुन्हा एकदा वादाच्या भोव:यात सापडले आहे.
 

Web Title: the action of the six story illegal building is controversial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.