रावणदहनाच्या कार्यक्रमात सेना-भाजप कार्यकर्त्यात हाणामारी
By Admin | Updated: October 11, 2016 18:56 IST2016-10-11T18:44:56+5:302016-10-11T18:56:29+5:30
मुंलूंडमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराचा रावण जाळण्यावरुन दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले

रावणदहनाच्या कार्यक्रमात सेना-भाजप कार्यकर्त्यात हाणामारी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - मुंलूंडमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराचा रावण जाळण्यावरुन दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले. भाजपा खासदार किरिट सोमय्या यांच्या हस्ते कार्यक्रम होणार होता. यावेळीच दोन्ही मित्रपक्षाच्या कतार्यकर्त्यांमद्ये हाणामारी झाली आहे. स्थानिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराच्या रावणाची प्रतिकृती तोडली आहे.
सेना भाजपाच्या या हल्ल्यानंतर किरिट सोमय्या यांनी भाजपाचे काही कार्यकर्ते जखमी झाल्याचे सांगीतले आहे. ते म्हणाले शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महिलावरही हल्ला केला आहे. मुंबई मनपा माफियाक्त करणार आहे. शिवसेनेला घाबरणार नाही.
दरम्यान, थोड्याच वेळात दादर येथे शिवाजी पार्कवर शिवसेच्या दसरा मेलाव्यास सुरवात होणार आहे. यासाठी राज्यातून विविध ठिकाणाहून सिवसैनिक जमले आहेत.