शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कमी दराने विक्री करणाऱ्या साखर कारखान्यांवर होणार कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 19:30 IST

साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल केला. राज्यातील काही साखर कारखाने त्यापेक्षा कमी दराने साखर विक्री करत असल्याचे समोर आले आहे

ठळक मुद्देसाखरेचा किमान विक्रीदर २९०० रुपयांवरुन ३४०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल करावा अशी मागणी

पुणे : केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर निश्चित केल्यानंतरही अनेक कारखाने त्यापेक्षा दराने साखर विक्री करीत आहेत. अशा कारखान्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत (ईसी अ‍ॅक्ट) कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी गुरुवारी दिला.   साखरेला उठाव नसल्याने अनेक साखर कारखान्यांनी साखरेचा किमान विक्रीदर २९०० रुपयांवरुन ३४०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल करावा अशी मागणी साखर कारखाना संघटनांनी केली होती. किरकोळ बाजारातील भाव मोठ्या प्रमाणावर वाढतील, त्यामुळे ग्राहकांचा रोष ओढवेल. हे टाळण्यासाठी साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल केला. राज्यातील काही साखर कारखाने त्यापेक्षा कमी दराने साखर विक्री करत असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी साखर आयुक्तांनी सहकारी व खासगी साखर कारखान्यांची बैठक साखर संकुल येथे बोलावली होती.   मागील आठवड्यात कमी दराने साखर विक्री करणाऱ्या काही कारखान्यांची नावे समोर आली होती. किमान विक्री दरापेक्षा शंभर ते दीडशे रुपये कमी भावाने विक्री करीत असल्याचे सांगण्यात येत होते. कागदोपत्री असा कोणताही कारखाना आढळला नाही. त्यामुळे छुप्या पद्धतीने कमी दरात साखर विक्री करणाऱ्या कारखान्यांना आयुक्तांनी तंबी दिली. कमी दराने साखर विक्री केल्याने साखर बाजाराला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे शुक्रवारपासून (दि.२९) राज्यातील काही साखर कारखान्यांची चौकशी करण्यात येईल. यात कोणताही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकार