शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

‘त्या’ आमदारांवर कारवाई की समज?, विधानसभा अध्यक्षांच्या आजच्या निर्णयाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 5:53 AM

सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील माहिती मी तपासून घेणार आहे. त्यानंतर उद्या यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय घेईन.

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोडे मारणे, या घटनेवरून सभागृहात झालेल्या गदारोळात झालेली घोषणाबाजी हे सगळे तपासून आपण शनिवारी सभागृहात निर्णय देऊ,असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.

अध्यक्ष संबंधित आमदारांवर निलंबनाची कारवाई करतात की त्यांना समज देतात याकडे आता लक्ष असेल. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याच्या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. या निमित्ताने विधानभवन परिसरातील आमदारांच्या वर्तणुकीचा मुद्दाही ऐरणीवर आला. 

तीनवेळा सभागृह गदारोळात तहकूब झाल्यानंतर अध्यक्ष नार्वेकर म्हणाले की विधान भवनाच्या आवारात काल जी घटना घडली ती अत्यंत चुकीची होती, याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नाही. त्याचप्रमाणे आज सभागृहात काही सदस्यांकडून पंतप्रधानांबाबत जे वक्तव्य करण्यात आले तेही चुकीचे असून तेदेखील अशोभनीय आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संसदीय कामकाज मंत्री आणि इतर दोन्ही बाजूंच्या सदस्यांसोबत माझी चर्चा झाली आहे. 

सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील माहिती मी तपासून घेणार आहे. त्यानंतर उद्या यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय घेईन. 

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरvidhan sabhaविधानसभा