औरंगाबादेत दारूसाठी अ‍ॅसिडहल्ला

By Admin | Updated: March 18, 2016 02:23 IST2016-03-18T02:23:11+5:302016-03-18T02:23:11+5:30

उधारीवर दारू दिली नाही, म्हणून चिडलेल्या दोघांनी दारू दुकानातील दोन नोकरांच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले. ही घटना बुधवारी रात्री बजाजनगर येथील देशी दारू दुकानावर घडली.

Acidhalla for alcohol in Aurangabad | औरंगाबादेत दारूसाठी अ‍ॅसिडहल्ला

औरंगाबादेत दारूसाठी अ‍ॅसिडहल्ला

औरंगाबाद : उधारीवर दारू दिली नाही, म्हणून चिडलेल्या दोघांनी दारू दुकानातील दोन नोकरांच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले. ही घटना बुधवारी रात्री बजाजनगर येथील देशी दारू दुकानावर घडली. या हल्ल्यात सतीश घोरपडे(२५, रा. आडगाव, भोकरदन, जालना) व शरद साळवे (३०,रा. बजाजनगर) हे दोघे गंभीर जखमी झाले. हल्लाखोर अशोक गव्हारे (३५) व प्रकाश जरारे (३८, रा. रांजणगाव, शेणपुंजी) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
बजाजनगरात जैस्वाल यांचे देशी दारूचे दुकान आहे. या दुकानावर सतीश आणि शरद हे दोघे कामाला आहेत. बुधवारी रात्री आरोपी अशोक गव्हारे व प्रकाश जरारे यांनी सतीशकडे दारूची मागणी केली.
सतीशने पैसे मागितले. आरोपींनी नंतर देतो, सध्या नाहीत, उधार दारू पाज, असे म्हटले. त्यावर सतीशने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या अशोक गव्हारे याने पांढऱ्या कॅनमध्ये असलेले अ‍ॅसिड काऊंटरवर असलेल्या सतीश व शरद यांच्या अंगावर फेकले.

Web Title: Acidhalla for alcohol in Aurangabad