आरोपीचा वाढदिवस पोलिसांना भोवला

By Admin | Updated: February 9, 2017 05:38 IST2017-02-09T05:38:00+5:302017-02-09T05:38:00+5:30

पोलीस कोठडीत आरोपीचा वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी बुधवारी आणखी एका पोलीस निरीक्षकासह सहा जणांना निलंबित करण्यात आले. कारवाई झालेल्या पोलिसांची संख्या १० झाली.

The accused's birthday was handed over to the police | आरोपीचा वाढदिवस पोलिसांना भोवला

आरोपीचा वाढदिवस पोलिसांना भोवला

भंडारा : पोलीस कोठडीत आरोपीचा वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी बुधवारी आणखी एका पोलीस निरीक्षकासह सहा जणांना निलंबित करण्यात आले. कारवाई झालेल्या पोलिसांची संख्या १० झाली.
तुमसरात हेमंत उके खून प्रकरणी अटक झालेल्या पाच जणांपैकी एकाचा सोमवारी वाढदिवस कोठडीतच केक कापून साजरा करण्यात आला. याचे छायाचित्र ‘व्हायरल’ झाल्यानंतर भंडारा पोलीस प्रशासनाने मंगळवारी चार कोठडी रक्षकांना तर बुधवारी पोलीस निरीक्षक राजेश शेट्टे यांच्यासह सहा जणांना निलंबित केले.

आरोपी भंडारा कोठडीत
खून प्रकरणातील या आरोपींची भंडारा सत्र न्यायालयाने ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी वाढविली आहे. परंतु हा प्रकार घडल्यानंतर या सर्व आरोपींना सुरक्षेच्या दृष्टीने भंडारा ठाण्यातील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले.

प्रकरण गंभीर
असून याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. ठाणेदार शेट्टे यांच्यासह दहा पोलिसांना निलंबित करून त्यांचे मुख्यालयात स्थानांतरण केले आहे.
- विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर

Web Title: The accused's birthday was handed over to the police