तिहेरी बॉम्बस्फोटांतील आरोपी राज्य एटीएसकडे

By Admin | Updated: August 2, 2016 05:50 IST2016-08-02T05:50:55+5:302016-08-02T05:50:55+5:30

तिहेरी बॉम्बस्फोटांसाठी दुबईतून पैसे पुरविणाऱ्या हवाला आॅपरेटरचा ताबा दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) घेतला आहे.

The accused of the triple bomb blasts in the state ATS | तिहेरी बॉम्बस्फोटांतील आरोपी राज्य एटीएसकडे

तिहेरी बॉम्बस्फोटांतील आरोपी राज्य एटीएसकडे


मुंबई : शहरात १३ जुलै २०११ रोजी झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांसाठी दुबईतून पैसे पुरविणाऱ्या हवाला आॅपरेटरचा ताबा दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) घेतला आहे. राष्ट्रीय तपासी यंत्रणेने (एनआयए) त्याला अटक केली होती. त्याला ५ आॅगस्टपर्यंतची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
अब्दुल वाहिद उर्फ अब्दुल उर्फ सिद्दिबाप्पा (३५) असे या हवाला आॅपरेटरचे नाव असून, तो मूळचा कर्नाटकातील भटकळ गावचा रहिवासी आहे. यासीन भटकळच्या संपर्कात आल्यानंतर त्याने दुबईला बस्तान बसवले होते. तो दुबईत राहून इंडियन मुजाहिद्दिनसाठी फंड गोळा करीत असे, अशी माहिती समोर आली होती.
मुंबईत १३ जुलै २०११ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांसाठीदेखील त्यानेच पैसा उभा केला होता. त्याने हा पैसा हवालामार्फत दिल्लीत कुंवर पथरिजा याच्याकडे पाठविला होता. त्यानंतर तो यासीन भटकळला मिळाला होता.
यासीनने या पैशांचा वापर स्फोटके खरेदी करण्यासाठी तसेच इतर खर्चासाठी केला होता, असे त्याच्या चौकशीत उघड झाले.
दादर येथील कबुतरखाना, झवेरी बाजार आणि आॅपेरा हाउस येथे एकाच वेळी झालेल्या स्फोटांत तब्बल २६ जणांचा मृत्यू तर १३० जण जखमी झाले होते. या प्रकरणी तब्बल १२ जणांना अटक करण्यात आली
होती.
त्यांच्या चौकशीत अब्दुल वाहिदचे नाव उघड झाले होते. तो दुबईत असल्याची माहिती मिळाल्यावर एनआयएनने इंटरपोलच्या मदतीने त्याला अटक केली. या वेळी एनआयएने त्याची चौकशी केल्यानंतर त्याचा ताबा राज्य एटीएसकडे देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The accused of the triple bomb blasts in the state ATS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.