शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
5
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
6
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
7
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
8
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
9
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
10
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
11
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
12
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
13
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
14
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
15
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
16
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
17
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
18
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
19
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
20
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल

तडीपार आरोपी पुरवतोय गांजा

By admin | Published: September 20, 2016 3:17 AM

एपीएमसीमध्ये दोन दशकांपासून गांजा विक्री करणाऱ्या हरिदास विधाते ऊर्फ टारझनला अटक केली

नवी मुंबई : एपीएमसीमध्ये दोन दशकांपासून गांजा विक्री करणाऱ्या हरिदास विधाते ऊर्फ टारझनला अटक केली असली तरी त्याचे एमआयडीसी परिसरातील अड्डे अद्याप सुरूच आहेत. वारली पाड्याजवळ एका झोपडीमध्ये गांजा विक्री केली जात असल्याचे लोकमतच्या पाहणीमध्ये आढळून आले आहे. अमली पदार्थमुक्त नवी मुंबई करण्यासाठी लोकमतने मोहीम हाती घेतली आहे. गांजासह इतर अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात मोहीम सुरू केल्यानंतर पोलिसांनीही शहरात धाडसत्र सुरू करून आतापर्यंत २१ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एपीएमसीमधील गांजा माफिया टारझनचाही समावेश आहे. टारझन तुरूंगात गेला तरी त्याचे नेटवर्क अद्याप सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तुर्भे ते महापे रोडवर वारलीपाड्याजवळील झोपडीमध्ये एका वृद्ध महिलेकडून गांजा विक्री करून घेतली जात आहे. यापूर्वी ८० ते १०० रूपयांना विकली जाणारी गांजाची पुडी पोलिसांच्या धाडसत्रामुळे १२० ते १५० रूपयांना विकली जात आहे. या परिसरातील कंपन्यांमध्ये नेपाळ, आसाम व इतर ठिकाणावरून शेकडो मजूर कामासाठी आले आहेत. या कामगारांना गांजा पुरविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. लोकमतच्या टीमनेही मागणी करताच त्यांना पैसे घेवून पुडी देण्यात आली. गांजा खरेदीसाठी आलेल्या दोन तरूणांना विचारणा केली असता आठवड्यातून दोन ते तीन वेळा आम्ही येथून खरेदी करत असल्याचेही त्यांनी सांगितले. एमआयडीसीमधील सदर महिलेलाही टारझनशी संबंधित व्यक्तीच गांजा पुरवत असल्याचे बोलले जात आहे. त्याचा मुलगा दत्ता विधाते यालाही एपीएमसी पोलिसांनी यापूर्वी अटक करून त्याला तडीपार केले होते. परंतु तडीपार केल्यानंतरही तो नवी मुंबईमध्ये वास्तव्य करत आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपला नसल्याचे बोलले जात असून पोलीस त्याची चौकशी करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या परिसरातील दक्ष नागरिकांनीही परिसरातील गांजा विक्री व इतर सर्व अवैध व्यवसाय थांबविण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)>‘लोकमत’चे आभार अमली पदार्थांविरोधात ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर पोलिसांनीही अनेक आरोपींना गजाआड केले आहे. सीवूडमध्ये लहान मुले अमली पदार्थांच्या विळख्यात अडकली असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे उद्यानांमधील टपोरींचा वावर थांबला आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांनी ‘लोकमत’चे आभार मानले असून हार्डवेअर व इतर दुकानांमध्ये जावून लहान मुलांना स्पेब ७ ची विक्री करू नये, असे आवाहन केले आहे.