शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

आधीच्या सरकारमधील खाती त्या-त्या पक्षांकडेच ? मुख्यमंत्र्यांसह भाजप- २१, शिंदेसेना- १२, अजित पवार गट- १० मंत्रिपदे 

By यदू जोशी | Updated: December 13, 2024 06:40 IST

भाजपने यावेळी शिंदेंना नगरविकास ऐवजी महसूल खात्याची ऑफर दिली आहे, अशी जोरदार चर्चा होती.

- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एक-दोन अपवाद सोडले तर फडणवीस सरकारमध्ये बहुतांश खाती ही शिंदे सरकारप्रमाणे त्या-त्या पक्षांकडेच राहतील, अशी दाट शक्यता आहे.

गृह, महसूल, जलसंपदा, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, गृहनिर्माण, ग्रामविकास, पर्यटन, वने, सांस्कृतिक कार्य, कौशल्य विकास, विधी व न्याय, अशी खाती भाजपकडे असतील. शिंदे सरकारमध्ये सामान्य प्रशासन अर्थातच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे होते. हे खाते नेहमीच मुख्यमंत्र्यांकडे असते. यावेळीही ते फडणवीस यांच्याकडे असेल.मंत्रिमंडळ विस्तारात अडचणीचा विषय ठरलेले नगरविकास खाते कोणाकडे जाणार, याबाबत उलटसुलट चर्चा आहे. मात्र, ते शिंदे यांच्याकडेच राहील, अशी नवीन शक्यता निर्माण झाली आहे.  ते स्वतः मुख्यमंत्री असताना नगरविकास खाते त्यांच्याकडेच होते. भाजपने यावेळी त्यांना नगरविकास ऐवजी महसूल खात्याची ऑफर दिली आहे, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, शिंदे यांनी नगरविकास खात्याचाच आग्रह धरला असून, तो मान्य होण्याची शक्यता आहे. 

कुणाला किती मंत्रिपदे? : सूत्रांनी सांगितले की, भाजपला मुख्यमंत्र्यांसह २१ मंत्रिपदे मिळतील. त्यात पाच राज्यमंत्री असतील. शिंदेसेनेला १२ मंत्रिपदे मिळतील, त्यातील तिघे राज्यमंत्री असतील. अजित पवार गटाला दहा मंत्रिपदे मिळतील, त्यातील दोघे राज्यमंत्री असतील. 

शिंदेसेनेकडे कोणती खाती? : १२ ऐवजी १३ मंत्रिपदे मिळावीत किंवा १२ मंत्रिपदे देणार असाल तर मग गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, महसूल, जलसंपदा, या चारपैकी एक महत्त्वाचे खाते आम्हाला द्या, असा आग्रह शिंदेसेनेने धरला आहे, असेही समजते. नगरविकास, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, उद्योग, उत्पादन शुल्क, परिवहन, पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंधारण, पणन, शालेय शिक्षण ही खाती शिंदेसेनेकडे राहतील. विधान परिषदेचे नेतेपद आणि सभापतिपद शिंदेसेनेला दिले जाईल, अशीही शक्यता आहे. 

अजित पवार गटाकडे कोणती खाती? : वित्त, सहकार, कृषी, अन्न व नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालकल्याण, अन्न व औषधी प्रशासन, क्रीडा व युवक कल्याण, मदत व पुनर्वसन, अशी खाती राहण्याची शक्यता आहे. 

शिंदेसेनेत दावेदार अधिक : शिंदेसेनेमध्ये मंत्रिपदाचे २० ते २२  प्रबळ दावेदार आहेत, सगळ्यांना संधी देता येणे शक्य नाही. त्यामुळे काही जणांना अडीच वर्षे तर काही जणांना उरलेली अडीच वर्षे मंत्रिपदे द्यावीत, असाही विचार सुरू आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस