शहरं
Join us  
Trending Stories
1
"मस्तवाल सत्ताधाऱ्यांना एका बोटाने हरवू शकतो, हे मतदारांनी दाखवून दिलं’’ उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
2
बीडमध्ये तुतारी वाजणार की कमळ फुलणार? पंकजा मुंडे यांचा री-काऊंटींगचा अर्ज  
3
Mumbai North West Lok Sabha Election Result 2024: खत्तरनाक! फक्त ४८ मतांनी विजय; रवींद्र वायकर आधी हरले, फेरमोजणीनंतर जिंकले
4
"देशातील जनतेचा विश्वास फक्त नरेंद्र मोदींवर", निकालानंतर अमित शाहंची पहिली प्रतिक्रिया
5
"भविष्यात हे चित्र बदलण्याची..."; लोकसभा निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
भाजपाचे बहुमत हुकले, एनडीएला सत्ता; नरेंद्र मोदींनी मानले देशवासीयांचे आभार, पुढील सरकारबाबत म्हणाले...
7
ममता बॅनर्जींचं मोठं विधान! भाजपाला PM पदासाठी सुचवला चेहरा; कोण आहे 'तो' नेता?
8
गांधीनगरमधून अमित शाह यांचा 7 लाखहून अधिक मतांनी बंपर विजय, तर वाराणसीतून PM मोदींची विजयी हॅटट्रिक
9
Beed Lok sabha Result 2024: बीडमध्ये धाकधुक वाढली! पंकजा मुंडे ३१ फेरीत ६९८ मतांनी पिछाडीवर, अखेरची फेरी राहिली
10
Mumbai North Lok Sabha Result 2024: उत्तर मुंबईचा गड भाजपाने राखला, पीयूष गोयल यांचा दणदणीत विजय
11
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाचवेळी दिल्लीला जाणार; काय घडतेय? एनडीए, इंडिया आघाडीत मोठ्या हालचाली
12
अजित पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ २०१ मते, लाजिरवाणा पराभव
13
Lok Sabha Election Result 2024 : "एक लोकप्रतिनिधी या नात्याने..."; अमेठीत पराभव झाल्यावर स्मृती इराणींची पहिली प्रतिक्रिया
14
काँग्रेसच्या रणरागिणीने भाजपाची क्लीन स्विप हुकवली, १५ वर्षांनंतर गुजरातेत जागा जिंकवली 
15
Lok Sabha Election Result 2024 : "...तर भाजपा स्वबळावर ३१० च्या पुढे गेली असती", फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
16
केरळमध्ये इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुललं; त्रिशूर लोकसभेवर सुरेश गोपी विजयी...
17
Lok Sabha Election Result 2024 : इंदूरच्या भाजप उमेदवाराचा १० लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय, नोटानंही केला विक्रम
18
“गरीब जनतेने संविधान वाचवले, मोदींचा पराभव दिसताच अदानींचे शेअर पडले”: राहुल गांधी
19
Lok Sabha Election Result 2024 : जनतेनं नाकारलंय नरेंद्र मोदींनी आता राजीनामा द्यावा; ममता बॅनर्जींचे टीकास्त्र 

मोठी बातमी : फडणवीसांकडे गृह, तर विखेंकडे महसूल; शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 4:52 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटेप जाहीर केलं आहे. पाहा कोणाकडे कोणती खाती.

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. त्यानंतर खातेवाटप कधी होणार आणि कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं दिलं जाईल याबाबत चर्चा सुरू होत्या. दरम्यान, मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप रविवारी जाहीर केले आहे.

खातेवाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे  सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभागांची जबाबदारी असणार आहे. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. 

अन्य  मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:

राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास

गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे- बंदरे व खनिकर्म

संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे- कामगार

संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत- उद्योग

प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण

रवींद्र  चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार- कृषी

दीपक केसरकर- शालेय शिक्षण व  मराठी भाषा

अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार