शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

पुण्यात दररोज होतोय एकाचा अपघाती मृत्यू, अपघातांची मालिका, आठ महिन्यांत २४२ जणांचे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 3:33 AM

पुणे शहरातील जीवघेण्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षी केवळ आठ महिन्यातच २४२ जणांना प्राण गमवावे लागले असून, ४९२ जणांना गंभीर दुखापतीचा सामना करावा लागला आहे.

पुणे : शहरातील जीवघेण्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षी केवळ आठ महिन्यातच २४२ जणांना प्राण गमवावे लागले असून, ४९२ जणांना गंभीर दुखापतीचा सामना करावा लागला आहे.जीवघेण्या रस्ते अपघाताचे सत्र शहरात सुरुच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात एका डंपरखाली येऊन युवतीला प्राण गमवावे लागले होते. त्यानंतरही जवळपास दररोजच जीवघेण्या अपघातांची मालिका सुरु आहे. मंगळवारी (दि. १७) एकाच दिवशी शहरातील विविध भागांत तीन जणांना प्राण गमवावे लागले. कोंढव्यात उंड्री चौकात कंटेनरने धडक दिल्याने २० वर्षीय युवती, पीएमपीच्या धडकेत चंदननगरला २१ वर्षीय तरुण आाणि ट्रकच्या धडकेत एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला.पोलिसांच्या वाहतूक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते आॅगस्ट २०१७ पर्यंत शहरात १ हजार ४७ अपघातांची नोंद झाली होती. शहरात दररोज जवळपास ५ अपघात होत आहेत. त्यात २४२ जणांना प्राण गमावावे लागले असून, ४९२ व्यक्ती गंभीर जखमी तर तर, ३१३ व्यक्ती किरकोळ जखमी झाली असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद वाखारे यांनी दिली. अपघातांची दरमहा सरासरी ही १३० इतकी आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांत जवळपास दोनशे अपघातांची यात भर पडली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीवघेण्या अपघातांची संख्या देखील अडीचशेवर पोहोचली आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात सर्वाधिक जीवघेणे अपघात झाले असून, त्यात ४० जणांना प्राण गमवावे लागले. तर ९३ जणांना गंभीर दुखापत झाली आहे.देशभरातील अपघातांची संख्या वाढत असल्याने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त करीत, ही संख्या निम्म्यावर आणण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना केली होती. पोलिसांच्या वाहतूक शाखेने शहरातील प्राणघातक अपघातांची ३६ ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) निश्चित केली असून, त्यात सर्वाधिक ९ ठिकाणे ही मुंबई-बेंगळुरु महामार्गावरील आहेत.सर्वाधिक ठिकाणे मुंबई - बंगळुरू महामार्गावरवाहतूक शाखेने शहरातील प्राणघातक अपघातांची ३६ ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) निश्चित केली असून, त्यात सर्वाधिक ९ ठिकाणे ही मुंबई-बेंगळुरु महामार्गावरील आहेत.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे