पुण्यातील सायकलपटूचा काश्मिरात अपघाती मृत्यू

By Admin | Updated: July 14, 2017 01:27 IST2017-07-14T01:27:09+5:302017-07-14T01:27:09+5:30

पुण्याचा सायकलपटू अजय पडवळ याचा जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी अपघाती मृत्यू झाला.

Accidental Death in Pune Cycle Driver | पुण्यातील सायकलपटूचा काश्मिरात अपघाती मृत्यू

पुण्यातील सायकलपटूचा काश्मिरात अपघाती मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्याचा सायकलपटू अजय पडवळ याचा जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी अपघाती मृत्यू झाला. तो २२ वर्षांचा होता.
‘खारदुंग ला’ या खिंडीतून लेहकडे येताना अपघातात अजयच्या डोक्याला मार लागला. त्याने हेल्मेट घातले होते, तरीही तो गंभीर जखमी झला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय लेहच्या
दिशेने येत होता. त्या वेळी नक्की काय झाले, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
अपघातानंतर रस्त्याच्या कडेला अत्यावस्थेत तो काही जणांना दिसला. त्याच्या डोक्याला मार लागला होता. अजयला उपचारासाठी स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, बुधवारी त्याने अखेरचा श्वास घेतला.
‘माउंटन बायकिंग’मध्ये निष्णात असलेल्या अजयने अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या डाऊनहिल स्पर्धांत लक्षणीय कामगिरी केली होती.

Web Title: Accidental Death in Pune Cycle Driver