शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

स्वत: तयार केलेल्या हेलिकॉप्टरची चाचणी घेताना झाला भीषण अपघात, ध्येयवेड्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 13:08 IST

Accident News: एका ध्येयवेड्या तरुणांच्या त्याने मनात असलेले ध्येय पुर्ण करता करता त्यातच त्याचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला. 

- विवेक पांढरेयवतमाळ - फुलसावंगी येथील एका ध्येयवेड्या तरुणांच्या त्याने मनात असलेले ध्येय पुर्ण करता करता त्यातच त्याचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला. शेख इस्माईल उर्फ मुन्ना हेलिकॉप्टर शेख इब्राहिम (वय २८ वर्षे)  या नावाने परिसरात प्रसिद्ध असलेल्या ध्येय वेड्या तरुणाने मागील तिन चार वर्षा पासुन तो सिंगल सिट हेलिकॉप्टर तयार करण्याचे ध्येय उराशी बाळगून, आपले कुटुंब चालवण्यासाठी दिवसभर स्वतः च्या वेल्डिंगच्या दुकानात कुटुंब चालवण्यासाठी काम करायचा व रात्रीला आपले ध्येय आहे ते पुर्ण करण्यासाठी तो हेलिकॉप्टर तयार करण्याचे काम करत होता. (The accidental death of a heroic young man, the dream of making a helicopter remained unfulfilled)

त्याचे शिक्षण हे फक्त ९ वी पर्यंत झालेले होते. आपल्या कल्पनाशक्ती व अजोड कलेच्या भरोश्यावर हेलिकॉप्टर तयार करण्याचे धाडस त्याने केले होतो. मुन्ना ने हेलिकॉप्टरमध्ये मारोती ८०० चे इंजिन वापरुन सिंगल सिट हेलिकॉप्टर बनवुन पुर्णत्वास ही नेले होते.येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रात्यक्षिक घेऊन "पेटेंट" मिळवायची त्याची तयारी झाली होती परंतु नियतीला हे मंजुर नव्हते काल मंगळवारी रात्री १:३० मी. अंदाजे एकदा त्याने बनवलेल्या हेलिकॉप्टरचे प्रात्यक्षिक घेण्याचे त्याने ठरवले आणि प्रात्यक्षिक घेत असतांनाच हेलिकॉप्टर च्या मागच्या पंख्यात बिघाड येउन तो पंखा तुटुन वरच्या फिरणाऱ्या मोठ्या पात्यावर आदळला आणि येथेच सर्व खेळ बिघडुन नियतीने घात केला. मागचा पंखा मोठ्या पात्यावर आदळल्याने ते पाते तुटुन त्याचा समतोल बिघडुन ते मोठे पाते कॅबिन मध्ये बसलेल्या शेख इस्माईल उर्फ मुन्ना हेलिकॉप्टर याच्या डोक्यावर जोरदार आदळले यामध्ये त्याच्या डोक्याला मोठी इजा झाल्याने त्याला उपचारासाठी पुसदला असतांनाच दुर्दैवाने त्याची प्राणज्योत मालवली अशा प्रकारे आपले ध्येय पुर्ण करता करताच ध्येयवेड्या शेख इस्माईलचा मृत्यु झाला.त्याच्या पश्चात वडिल, आई, एक भाऊ , बहिणी असा मोठा आप्त परिवार आहे. त्याच्या अशा जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :AccidentअपघातYavatmalयवतमाळ