मुरुड-भांडुप एसटीला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2016 07:42 IST2016-06-07T07:42:01+5:302016-06-07T07:42:01+5:30
मुरुड-भांडुप या एसटीला मुरुड येथील काशिद बीचजवळ अपघात झाल्याने यामध्ये असणारे चार प्रवासी व चालक गंभीर जखमी झाले आहेत.

मुरुड-भांडुप एसटीला अपघात
मुरुड/आगरदांडा : मुरुड आगारातून सकाळी ६.३० वा. सुटणारी गाडी क्र. एमएच १४ बीटी १४०६ मुरुड-भांडुप या एसटीला मुरुड येथील काशिद बीचजवळ अपघात झाल्याने यामध्ये असणारे चार प्रवासी व चालक गंभीर जखमी झाले आहेत.
मुरुड येथून सकाळी ६.३० वाजता भांडुपला जाणारी गाडी काशिदजवळ सकाळी ७.४५ वाजता सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने झाडावर जोरदार आदळली. गाडीमध्ये असणाऱ्या प्रवाशांनी आक्रोश केला. या गाडीत २३ प्रवासी प्रवास करीत होते. त्यामधील ४ प्रवासी त्यापैकी सुजाता पाटील, सिद्धी गुंजाळ, नंदिता पाटील, बाळकृष्ण मेस्त्री व चालक एस. ए. रुपनर हे जखमी झाले. त्या जखमी प्रवासी व चालकाला मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या सर्वांवर उपचार सुरू आहेत. चालक एस. ए. रुपनर म्हणाले की, गाडीचा पाटा तुटल्याने गाडीवरचा ताबा सुटला. त्यामुळे हा अपघात झाला. (वार्ताहर)