दिवाकर रावते यांच्या गाडीला अपघात

By Admin | Updated: January 7, 2016 02:17 IST2016-01-07T02:17:52+5:302016-01-07T02:17:52+5:30

वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या परिवहन मंत्र्यांच्या गाडीलाच अपघात झाल्याची घटना घडली. दिवाकर रावते यांची गाडी बुधवारी दुपारी

Accident of Diwakar Raote's car | दिवाकर रावते यांच्या गाडीला अपघात

दिवाकर रावते यांच्या गाडीला अपघात

मुंबई : वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या परिवहन मंत्र्यांच्या गाडीलाच अपघात झाल्याची घटना घडली. दिवाकर रावते यांची गाडी बुधवारी दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास लोअर परळमधील कमला मिल पुलावर एका टुरिस्ट कारवर आदळली. या अपघातानंतर त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
परिवहन मंत्री रावते त्यांच्या गाडीने मंत्रालयात जाण्यासाठी निघाले होते. त्यांची कार लोअर परळमधील कमला मिल पुलावर आली असताना त्यांच्या पुढे चाललेल्या टुरिस्ट स्विफ्ट डिझायर कार चालकाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे रावते यांची कार स्विफ्ट कारवर जाऊन आदळली. यात रावते यांच्या हातापायाला दुखापत झाली. पोलिसांनी त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल केले. त्यांना तपासणीनंतर घरी सोडण्यात आले. रावते यांची प्रकृती स्थिर असून त्यांना मुकामार अधिक बसल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी तपासाअंती टुरिस्ट कारचालक ब्रिजेश यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सायंकाळी त्याला अटक केली.

Web Title: Accident of Diwakar Raote's car