कांद्याच्या गावाला ‘कॅशलेस’चे ग्रहण, रोकड टंचाई; किरकोळ बाजारपेठ ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 05:44 AM2017-11-07T05:44:33+5:302017-11-07T05:44:37+5:30

नोटाबंदी व जीएसटीनंतर १० हजारांवरील व्यवहार कॅशलेस झाल्याने, आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावला ग्रहण लागले आहे.

 Acceptance of Cashless, Cash Scarcity for Onion Village; Retail market jam | कांद्याच्या गावाला ‘कॅशलेस’चे ग्रहण, रोकड टंचाई; किरकोळ बाजारपेठ ठप्प

कांद्याच्या गावाला ‘कॅशलेस’चे ग्रहण, रोकड टंचाई; किरकोळ बाजारपेठ ठप्प

Next

योगेश बिडवई
मुंबई : नोटाबंदी व जीएसटीनंतर १० हजारांवरील व्यवहार कॅशलेस झाल्याने, आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावला ग्रहण लागले आहे. चार महिन्यांपासून कांदा व्यापाºयांनी शेतकºयांना चेकने पैसे देणे
सुरू केल्याने, रोकड टंचाईमुळे गावातील व्यापार ठप्प झाला
आहे. यामुळे लासलगावची दररोजची सुमारे दोन कोटींची उलाढाल
आता केवळ ५० लाखांवर आली आहे.
सरकारने ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या नोटाबंदीनंतर गेल्या वर्षी रोकडअभावी कांदा मार्केट दोन महिने जवळपास बंद असल्यासारखी स्थिती होती. त्याचा व्यावसायिकांना फटका बसला. आता शेतकºयांना चेक देणे सुरू झाले आहे. ते पैसे दोन-तीन दिवसांत खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे कांदा विकल्यानंतर गावी जाण्यापूर्वी लासलगावातून आवश्यक वस्तूंची खरेदी करणे शेतकºयांनी बंद केले आहे.
लासलगाव येथील बाजारपेठेत किराणा, कापड, वाहनांचे स्पेअर
पार्ट, खते, बी-बियाणे, शेतीची अवजारे आदींचे डिलर्स आहेत. अपेक्षित व्यवसायाअभावी ते अडचणीत आले आहेत. त्यामुळे व्यापाºयांनी एकत्र येत, त्यावर मार्ग काढण्यासाठी महासंघ स्थापन केला आहे.

रोख व्यवहार हवेत
‘कॅशलेस’च्या संकटातून बाहेर पडण्यासाठी गावातील सर्व व्यापाºयांनी शनिवारी बैठक घेतली. कांदा व्यापाºयांनी शेतकºयांना किमान १० हजार रुपये रोख देण्याची मागणी त्यांनी लासलगाव बाजार समितीकडे केली आहे.

लाखो रुपये गुंतवणूक करून व्यापाºयांनी व्यवसाय सुरू केले. कांद्याचे व्यापारी चेकने पैसे देत असल्याने, व्यापार रोडावला आहे. हे असेच सुरू राहिले, तर व्यापारी देशोधडीला लागतील.
- सुनील आब्बड, समन्वयक, व्यापारी महासंघ
कॅशलेसच्या आदेशामुळे कांदा व्यापारी शेतकºयांना चेकने पैसे चुकते करतात. धान्य बाजारात मात्र, छोटे व्यवहार असल्याने शेतकºयांना रोख पैसे मिळतात. कॅशलेस म्हणजे केवळ चेकने पैसे देणे नव्हे. त्याऐवजी व्यापारी एनईएफटी व डीडीद्वारेही शेतकºयांना पैसे देऊ शकतात. विंचूर उपबाजार आवारात व्यापारी एनईएफटीद्वारे शेतकºयांना पैसे देत आहेत.
- बी. वाय. होळकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव

दररोज अडीच कोटींच्या कांद्याची खरेदी
लासलगावला रोज साधारणपणे १० हजार क्विंटल कांद्याची आवक होते. क्विंटलमागे सरासरी अडीच हजार रुपये भाव धरला, तर रोज २ कोटी ५० लाख रुपये शेतकºयांना वाटप केले जातात. ही रक्कम चेकने देण्यात येत आहे.

Web Title:  Acceptance of Cashless, Cash Scarcity for Onion Village; Retail market jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.