‘समृद्धी’साठी अबुधाबीची गुंतवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 05:54 IST2018-06-13T05:54:11+5:302018-06-13T05:54:11+5:30
मुंबई-नागपूर या अष्टपदरी समृद्धी महामार्गासाठी अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अॅथॉरिटी आणि अबुधाबीचे शेख कर्ज देण्यास तयार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

‘समृद्धी’साठी अबुधाबीची गुंतवणूक
विशेष प्रतिनिधी
मुंबई - मुंबई-नागपूर या अष्टपदरी समृद्धी महामार्गासाठी अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अॅथॉरिटी आणि अबुधाबीचे शेख कर्ज देण्यास तयार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच संयुक्त अरब आमिरातीचा दौरा केला होता. त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांसोबत समृद्धी महामार्गाबाबत चर्चा केली होती. महिनाभर या वाटाघाटी सुरू होत्या. अबुधाबीने या प्रकल्पात गुंतवणूक करण्याचे मान्य केले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग ७१० किलोमीटर लांब असून त्यासाठी ४६,००० कोटी खर्च अपेक्षित आहे. यापैकी १६,००० कोटी महाराष्टÑ राज्य रस्ते विकास महामंडळाच्या समभाग विक्रीतून उभे राहणा आहेत. उरलेले ३०,००० कोटी रुपये कर्ज स्वरुपात देण्यास बँकांनी अनुत्सुकता दाखवल्याने निधी उभारणी करण्यात अडचण निर्माण झाली होती. आता अबुधाबीने गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविल्याने समृद्धी महामार्गाच्या प्रगतीतील मोठा अडसर दूर झाला आहे. सध्या समृद्धी महामार्गाचे काम वेगात सुरू असून १० जिल्ह्यात भूमी संपादन करण्याचे काम सरकारने सुरू केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.