शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

"अबू आझमी निलंबित झाला पाहिजे, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे"; एकनाथ शिंदे विधानसभेत कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:21 IST

"हा अबू आझमी देशद्रोही आहे. म्हणून या देशद्रोह्याला या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही..."

सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत 'छावा' चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या ऐतिहासिक चित्रपटाच्या माध्यमाने छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी आणि धर्मासाठी केलेले बलिदान अगदी कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत आहे. चित्रपट पाहून सर्वांचेच डोळे पाणावत आहेत. त्यांचे बलिदान तरूण पिढीला प्रेणार देणारे आहे. सत्ता धाऱ्यांपासून ते अगदी विरोधकांपर्यंत सर्वचजण या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. मात्र, यातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कोतुक करत वादग्रस्त विधान केले आहे. "औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि म्यानमारपर्यंत होती. जीडीपी २४ टक्के होता. हे सर्व मी चुकीचे म्हणू का?" असा प्रश्न करत, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाची लढाई सत्तेसाठी होती. धर्मासाठी नव्हती," असे अबू आझमी यांनी म्हटले होते. आझींच्या या विधानाचे पडसाद आज विधानसभेत बघायला मिळाले. 'अबू आझमींना निलंबित करण्याची आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.

यासंदर्भात विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "काल, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजेच औरंग्याचे गोडवे, याठिकाणी अबू आझमीने गायले. खरं म्हणजे अबू आझमीचा निषेध करायला हवा. अबू आझमीचा धिक्कार करतो. अबू आझमीचा धक्कार करत असताना, अबू आझमीने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय चुकीचे वक्तव्य केले होते. अबू आझमी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जाणीवपूर्वक अपमाण करतो. 

"छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केले, आपल्या प्राणाचे बलिदान केले मात्र धर्म बदलला नाही. अशा संभाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमाण करणे, म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आहे. म्हणून या देशद्रोह्याला या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही. म्हणून, आपण 'छावा' बघा, रईस... छावा सिनेमा बघा," असेही शिंदे म्हणाले.

शिंदे पुढे म्हणाले, "छत्रपती संभाजी महाराजांवर ४० दिवस अनन्वित अत्याचार केले. त्यांचे डोळे काढले, त्यांची नखे काढली, त्यांची जीभ कापली, अंग सोलले, त्यावर मीठ टाकले, एवढा अपमाण केला, चाळीस दिवस हा अत्याचार सुरू होता. धर्म बदला म्हणून सांगितले. अशा औरंग्याचे गोडवे गाणे म्हणजे आपल्या राष्ट्र पुरुषांचा अपमाण आहे. आपल्या देशभक्तीचा अपमाण आहे. मी एवढेच सांगतो,देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था।महा पराक्रमी परम प्रतापी, एकही शंबू राजा था।।"

शंभू राजाने ९ वर्षांत ६९ लढाया जिंकल्या -शिंदे म्हणाले, "अरे या शंभू राजाने ९ वर्षांत ६९ लढाया जिंकल्या." यानंतर विरोधकांकडे हात वारे करत शिंदे म्हणाले, "अरे लाज वाटायला हवी. या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडून टाकली. आया-बहिणींवर अत्याचार केला. आया-बहिणींवर बलात्कार झाले. या औरंग्याने बापाला कैद केले, मुलांना मारून टाकले. २७ लोकांना मारले. असे सांगत, अबू आझमी निलंबित झाला पाहीजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे," अशी मागणी यावेळी शिंदे यांनी केली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAbu Azmiअबू आझमीvidhan sabhaविधानसभाChhaava Movie'छावा' चित्रपट