शहरं
Join us  
Trending Stories
1
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
2
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
4
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
5
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
6
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
7
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
8
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
9
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
10
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
11
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
12
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
13
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
14
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
15
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
16
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
17
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
18
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
19
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
20
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे वातावरण भीतिदायक वाटत होते - साक्षीदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 00:34 IST

दरवर्षी कोरेगाव भीमाला दीड-दोन लाख लोक भेट देतात. तेव्हा पोलीस बंदोबस्त असतो. मात्र यंदा चार-पाच लोक भेट देणार असतानाही संभाजी महाराज व गोविंद गायकवाड यांच्या समाधीस्थळ परिसरात पोलीस बंदोबस्त नव्हता.

मुंबई : दरवर्षी कोरेगाव भीमाला दीड-दोन लाख लोक भेट देतात. तेव्हा पोलीस बंदोबस्त असतो. मात्र यंदा चार-पाच लोक भेट देणार असतानाही संभाजी महाराज व गोविंद गायकवाड यांच्या समाधीस्थळ परिसरात पोलीस बंदोबस्त नव्हता. दुकाने बंद होती आणि भगवे झेंडे घेतलेला जमाव ‘जय भवानी - जय शिवाजी’ अशा घोषणा देत होता. जबरदस्ती सगळ्यांच्या कपाळावर भंडारा लावला जात होता. पोलिसांच्या अनुपस्थितीने यंदाचे वातावरण भीतीदायक वाटत होते, अशी साक्ष घाटकोपर येथे राहणाऱ्या तानाजी साबळे यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला शुक्रवारी दिली.बेस्टमध्ये वाचकाचे काम करणारे ४९ वर्षीय तानाजी साबळे २००८ पासून नेमाने कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जातात. ते घाटकोपरच्या भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य आहेत. कोरेगाव भीमा येथे त्यांनी तीन बस भरून माणसे नेली होती. ‘आम्ही सर्व आधी वळू येथे गेलो. बस वळूपासून काही अंतरावर होती. आम्ही संभाजी महाराज व गोविंद गायकवाड यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. मात्र यंदा येथे वातावरण भीतीदायक होते. पोलीस उपस्थित नव्हते,’ अशी साक्ष साबळे यांनी नोंदवली.वळूवरून कोरेगाव भीमाला जाण्याचा रस्ता म्हाताºया शेतकºयाने दाखवला. तेथे जाताना नदी पलिकडच्या काठाच्या बाजूने धुराचे लोळ उठल्याचे दिसत होते. दडगफेक, जाळपोळ सुरू होती. बाईकला भगवे झेंडे लावलेले लोक मोठ्याने 'जय भवानी - जय शिवाजी' अशा घोषणा देत होते. दंगलखोरांना आवरण्याऐवजी पोलीस आम्हालाच दमदाटी करून पळवत होते, अशी माहिती साबळे यांनी मिलिंद एकबोटे यांच्यातर्फे अ‍ॅड. नितीन प्रधान यांनी घेतलेल्या उलटतपासणीत दिली. बाईकला भगवे झेंडे लावलेल्यांनी टायर जाळल्याचे किंवा त्यांनी दगडफेक केल्याचे तुम्ही प्रत्यक्ष पाहिले का, या प्रश्नावर साबळे यांनी नकारात्मक उत्तर दिले. असा संशय असल्याचे त्या म्हणाल्या. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे हे साबळे यांची उलटतपासणी घेतील. उलटतपासणी २४ सप्टेंबरपर्यंत तहकूब झाली आहे.- घटनेचे साक्षीदार म्हणून आयोगापुढे मुंबईतील ११४ जणांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. मात्र यापैकी १० ते १२ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष आयोगापुढे नोंदविण्यात येणार आहे.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारMaharashtraमहाराष्ट्र