मुलीचाच गर्भ राहतो म्हणून वारंवार गर्भपात
By Admin | Updated: October 21, 2016 19:37 IST2016-10-21T19:37:34+5:302016-10-21T19:37:34+5:30
वारंवार मुलीचांच गर्भ असतो म्हणून जबरीने तीन वेळा गर्भपात करून विवाहितेस मानसिक त्रास दिल्याप्रकरणी सासरच्या आठ जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीचाच गर्भ राहतो म्हणून वारंवार गर्भपात
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. २१ : वारंवार मुलीचांच गर्भ असतो म्हणून जबरीने तीन वेळा गर्भपात करून विवाहितेस मानसिक त्रास दिल्याप्रकरणी सासरच्या आठ जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मोठा माळीवाडा भागातील २५ वर्षीय विवाहितेस सासरची मंडळी त्रास देत होती. विवाहितेस तीन वेळा गर्भ राहिला. तिन्ही वेळी तो मुलीचाच असल्यामुळे गर्भपात करावयास लावला. त्यामुळे विवाहितेस मानसिक व शाररिक त्रास झाला.
वारंवारच्या या प्रकाराला कंटाळून विवाहितेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून निकिता राकेश माळी, मिना नारायण माळी रा.सोनाबाई नगर, नंदुरबार, नारायण आनंदराव पाटील रा.धडगाव, विक्की नारायण पाटील, यशवंत आनंदराव पाटील, भूषण पाटील, कन्हैयालाल भाईदास साळुंके, कारभारी भाईदास साळुंके रा.शेवाळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.