उमविच्या दीक्षांत समारंभाला अब्दुल कलाम येणार

By Admin | Updated: May 7, 2014 01:17 IST2014-05-07T01:17:06+5:302014-05-07T01:17:06+5:30

उमविच्या दीक्षांत समारंभाला अब्दुल कलाम येणार जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा बाविसावा दीक्षांत समारंभ २१ मे रोजी माजी राष्ट्रपती डॉ़ए़पी़जे़अब्दुल कलाम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे़

Abdul Kalam will be present at the congress ceremony | उमविच्या दीक्षांत समारंभाला अब्दुल कलाम येणार

उमविच्या दीक्षांत समारंभाला अब्दुल कलाम येणार

उमविच्या दीक्षांत समारंभाला अब्दुल कलाम येणार जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा बाविसावा दीक्षांत समारंभ २१ मे रोजी माजी राष्ट्रपती डॉ़ए़पी़जे़अब्दुल कलाम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे़ विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात दुपारी २ वाजता हा समारंभ होणार असून माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे दीक्षांत भाषण होणार आहे़ कुलगुरू प्रा़सुधीर मेश्राम यांच्या हस्ते स्नातकांना पदवी प्रदान केली जाणार आहे़ या समारंभात एकूण १४ हजार ८९० स्नातकांना पदवी दिली जाणार आहे़ ७४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके दिली जाणार आहेत़ तर १३३ पीएच़डी़धारकांना या समारंभात पदवी दिली जाणार आहे़ विद्यापीठात दीक्षांत समारंभाच्या तयारीला सुरुवात झाली असून कुलगुरूंच्या उपस्थितीत तयारीचा आढावा घेण्यात आला़ तयारीबाबत विविध समितींची स्थापना करण्यात आली आहे़

Web Title: Abdul Kalam will be present at the congress ceremony