शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
3
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
4
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
5
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
6
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
7
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
8
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
9
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
10
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
11
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
12
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
13
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
14
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
15
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
16
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

‘युग’चे अपहरण, १० कोटींची मागणी ?

By admin | Published: September 02, 2014 1:17 AM

शहरातील प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ. मुकेश चांडक यांच्या युग (वय ८) नामक मुलाचे अपहरण झाल्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. अपहरण करणारा आरोपी युगच्या ओळखीचाच आहे. मात्र,

आठ वर्षीय बालक : अपहरणकर्त्याने दुचाकीवर नेलेनागपूर : शहरातील प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ. मुकेश चांडक यांच्या युग (वय ८) नामक मुलाचे अपहरण झाल्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. अपहरण करणारा आरोपी युगच्या ओळखीचाच आहे. मात्र, तो कोण आहे ते स्पष्ट न झाल्यामुळे युग आणि त्याचे अपहरण करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांची यंत्रणा खडबडून कामी लागली आहे.डॉ. चांडक यांचे सेंट्रल एव्हेन्यूवर डेंटल क्लिनिक असून, ते छापरूनगर-सुदर्शननगर चौक मार्गावर गुरुवंदन अपार्टमेंटमध्ये राहातात. युग वाठोड्यातील सेंटर पॉर्इंट स्कूलमध्ये सेकंडला (दुसऱ्या वर्गात) शिकतो. नेहमीप्रमाणे आज सायंकाळी ५च्या सुमारास युग घरी परतला. त्याने आपली स्कूलबॅग चौकीदाराच्या खुर्चीवर फेकली अन् तसाच उलटपावली तो रस्त्यावर गेला. रस्ता दुभाजकाच्या पलीकडे दुचाकीवर एक तरुण होता. युग त्याच्या दुचाकीवर बसला आणि हे दोघे सुसाट वेगाने निघून गेले. दोन-अडीच तास झाले तरी युग घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या आईने युगच्या वडिलांना हा प्रकार सांगितला. डॉ. चांडक यांनी लगेच लकडगंज ठाण्यात घटनेची माहिती दिली. ठाणेदार सत्यनारायण जयस्वाल यांनी नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहर तसेच ग्रामीण पोलिसांना आठ वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याची माहिती कळवली. तसेच ठाण्यातील झाडून सर्वच कर्मचारी-अधिकारी वेगवेगळ्या भागात युगचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले.युगचे अपहरण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उपराजधानीतील काही अतिउत्साही मंडळींनी व्हॉटस् अपवरून चुकीचे संदेश पाठविणे सुरू केले. त्यामुळे अफवांचा बाजार गरम झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, याचवेळी डॉ. चांडक यांच्या मोबाईलवर दोन फोन आले. पहिल्यांदा एकाने ‘तुम डॉक्टर चांडक बोल रहे क्या’, असे विचारले. तर, दुसऱ्यांदा फोन आला तेव्हा अपहरणकर्त्याने चांडक यांना युगच्या बदल्यात १० कोटींची मागणी केल्याचे समजते.गणपतीबाप्पाला साकडे गुरुवंदन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या १७ कुटुंबीयांनी गणपतीची स्थापना केली आहे. दररोज सकाळी व सायंकाळी पूजेच्या वेळी येथे सर्व कुटुंब उपस्थित असतात. युगचे अपहरण झाल्याने आज रात्रीच्या आरतीच्या वेळी गणपतीजवळ सर्वांनीच युग सुखरूप परत यावा, यासाठी साकडे घातले. ‘तो’ ओळखीचाच. मात्र, कोण ? अपहरण करणारा ‘तो‘ दुचाकीस्वार युगच्या अर्थात चांडक परिवाराच्या ओळखीचाच असल्याचा अंदाज आहे. कारण युग सायंकाळी ५च्या सुमारास शाळेतून परतला तेव्हा ‘त्या‘ तरुणाशी त्याचे बोलणे झाले असावे. त्याचमुळे घाईगडबडीतच युग प्रवेशदाराच्या आत आला आणि त्याने आपली स्कूल बॅग अक्षरश: चौकीदाराच्या खुर्चीवर फेकतच मागे पळ काढला. पाच ते सात मिनिटे रस्त्याच्या पलिकडे दुचाकीवर असलेल्या ‘त्या‘ तरुणासोबत यश बोलत होता. नंतर त्याच्या दुचाकीवर बसला आणि निघून गेला. चौकीदाराने हे सर्व पाहिले. दुचाकीस्वार तोंडावर स्कार्फ बांधून असल्यामुळे चौकीदाराला तो कोण आहे, हे लक्षात आले नाही.