शीना बोराच्या हत्येला आरुषी प्रकरण बनू देणार नाही - राकेश मारिया

By Admin | Updated: September 6, 2015 09:37 IST2015-09-06T09:37:52+5:302015-09-06T09:37:52+5:30

शीना बोरा हत्या प्रकरणाला दिल्लीतील आरुषी प्रकरण बनू देणार नाही, हा मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे असे वक्तव्य मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी केले आहे.

Aarushi case will not be allowed to kill Sheena Bazaar: Rakesh Maria | शीना बोराच्या हत्येला आरुषी प्रकरण बनू देणार नाही - राकेश मारिया

शीना बोराच्या हत्येला आरुषी प्रकरण बनू देणार नाही - राकेश मारिया

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ६ - शीना बोरा हत्या प्रकरणाला दिल्लीतील आरुषी प्रकरण बनू देणार नाही, हा मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे असे वक्तव्य मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी केले आहे. ३० सप्टेंबरला मला बढती मिळणार असून त्यापूर्वीच मला इंद्राणी प्रकरणातील सर्व महत्त्वाचे पुरावे गोळा करुन ठेवायचे आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. 

शीना बोरा हत्याप्रकरणाचा तपास करणा-या राकेश मारिया यांनी रविवारी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी शीना बोरा प्रकरणावर भाष्य केले. प्रसारमाध्यम स्वतःच इंद्राणी प्रकरणात चौकशी करत असून त्यांच्यामुळे आम्हाला पुरावे गोळा करण्यात अडचणी होत आहेत असा आरोप त्यांनी केला. शीनाची हत्या तीन वर्षांपूर्वी झाल्याने पुरावे गोळा करताना अडचणी येत आहेत. दहशतवाद्याची चौकशी करताना संयम ठेवावे लागत नाही, पण इंद्राणी उच्चशिक्षीत आहे हेच आमच्यासमोरील आव्हान आहे. मुंबई पोलिसांनी बेस्ट टीम या प्रकरणाचा तपास करत आहे, हे पथक गेल्या अनेक दिवसांपासून घरीदेखील गेले नाहीत असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Aarushi case will not be allowed to kill Sheena Bazaar: Rakesh Maria