शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आरतीचा प्रयत्न; आव्हाडांची अजित पवारांवर शेलक्या शब्दात टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 22:16 IST

जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरुन अजित पवार गट आक्रमक झाला आहे.

ठाणे : शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरुन अजित पवार गट आक्रमक झाल्याचा पहायला मिळाला. या वक्तव्याविरोधात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या घरासमोर जय श्रीरामच्या घोषणा देत आरती करण्याचा प्रयत्न केला. 

जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल; पहिल्यांदाच मनातले सर्वकाही बोलले

दरम्यान, या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर शेलक्या शब्दात टीका केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत आव्हाड म्हणाले की, "माझ्या घरावर आता अजित पवार यांच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला. मोजून चारच जण होते. श्री रामाचा इतिहास माहित नसलेल्या औलादींना श्री रामाचा इतिहास समजून सांगावा लागेल. श्री रामाने वनवास केवळ एवढ्याचसाठी स्वीकारला  होता की , त्यांच्या आईवडिलांमध्ये जे आपापसात ठरले होते, त्यामुळे भरत यांना म्हणजेच आपल्या बंधूला सिंहासन देण्यासाठी चौदा वर्षे वनवास भोगला." 

"पण, सम्राट भरत यांनी श्री रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला. इथे आताच्या यांच्या इतिहासामध्ये यांच्या बापाने आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत. मात्र, आमच्यासारखे त्यांचे सेवक उभे आहेत, म्हणून यांचा प्लॅन सक्सेस होऊ शकत नाही. यांचा प्लॅन हानून पाडू आम्ही! तेव्हा आधी इतिहास समजून घ्या, श्री राम आईवडिलांना मानायचे. तुमचे नेते आईवडिलांचा अपमान करून त्यांना घराच्या बाहेर घालवताहेत," अशी टीका आव्हाडांनी अजित पवारांवर केली.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी, आव्हाड व्यासपीठावरुन बोलत होते. ''आपण हा इतिहास तुम्ही वाचत नाही. राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम. शिकार करुन खाणारा राम तो आमचा आहे, बहुजनांचा. तुम्ही तिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात. पण, त्या रामाचा आम्ही आदर्श पाळतो आणि मटन खातो आहोत. राम हा शाकाहारी नव्हताच, तो मांसाहारी होता. 14 वर्षे जंगलात जाणारा माणूस कुठे जाणार शाकाहारी अन्न शोधायला, मी जे बोलतो ते खरंच बोलत असतो'', असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नवा वाद निर्माण केला आहे. 

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणे