आमिर खानने केले ग्रामस्थांचे कौतुक

By Admin | Updated: April 27, 2017 01:38 IST2017-04-27T01:38:57+5:302017-04-27T01:38:57+5:30

‘पाण्याचं काम हे पुण्याचं काम आहे. तुमचं काम पाहून मला खूप आनंद झाला,’ अशा शब्दांत अभिनेता आमिर खान यांनी

Aamir Khan appreciates villagers | आमिर खानने केले ग्रामस्थांचे कौतुक

आमिर खानने केले ग्रामस्थांचे कौतुक

ढाणकी (यवतमाळ) : ‘पाण्याचं काम हे पुण्याचं काम आहे. तुमचं काम पाहून मला खूप आनंद झाला,’ अशा शब्दांत अभिनेता आमिर खान यांनी मराठीतून कौतुक करताच बंदीभागातील एकंबा व कृष्णापूरचे गावकरी भारावून गेले. उमरखेड तालुक्याच्या बंदीभागात बुधवारी आमिर खान जलसंधारणाचा संदेश देऊन गेला. पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी आणि गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव बुधवारी दाखल झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Aamir Khan appreciates villagers