आम आदमी पक्षाचा आशिष शेलारांवर गैरव्यवहाराचा आरोप
By Admin | Updated: July 27, 2016 17:17 IST2016-07-27T17:09:43+5:302016-07-27T17:17:26+5:30
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर आम आदमी पक्षाने गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत.

आम आदमी पक्षाचा आशिष शेलारांवर गैरव्यवहाराचा आरोप
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर आम आदमी पक्षाने गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. आशिष शेलार संचालक असलेल्या सर्वेश लॉजिस्टिक कंपनीची काही कोटींचे कर्ज मिळेल इतकी उलाढाल नसताना या कंपनीला सहा कोटींचे बेकायद कर्ज दिल्याचा आरोप आप नेत्या प्रिती शर्मा मेनन यांनी केला आहे. आता आशिष शेलार आपच्या या आरोपांवर काय स्पष्टीकरण देतात आणि भाजपची भूमिका काय असेल याकडे लक्ष लागले आहे.