Video - "हाती घेतली मशाल, निष्ठेचा विजय झाला विशाल; हीच मशाल धगधगणार मुंबईभर, महाराष्ट्रभर"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 03:19 PM2022-11-06T15:19:59+5:302022-11-06T15:23:58+5:30

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. तसेच एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

Aaditya Thackeray tweet Over Andheri East Bypoll Election Result Rutuja Latke won | Video - "हाती घेतली मशाल, निष्ठेचा विजय झाला विशाल; हीच मशाल धगधगणार मुंबईभर, महाराष्ट्रभर"

Video - "हाती घेतली मशाल, निष्ठेचा विजय झाला विशाल; हीच मशाल धगधगणार मुंबईभर, महाराष्ट्रभर"

googlenewsNext

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत. लटके या दणदणीत मतांनी विजयी झाल्या. या निवडणुकीत एकूण ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर ६ अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. "अंधेरी पोटनिवडणुकीतील विजय हा रमेश लटके यांच्या कार्याचा, शिवसैनिकांच्या जिद्दीचा" असं म्हटलं आहे. 

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. तसेच एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. "आज अंधेरी पोटनिवडणूकीत जो विजय मिळाला तो स्व. रमेश लटके जी यांच्या कार्याचा आहे, निष्ठेचा आहे, शिवसैनिकांच्या जिद्दीचा आहे आणि शिवसेनेवर, उद्धवसाहेबांवर जनतेच्या असलेल्या दृढ विश्वासाचा आहे! ह्या विजयातून निर्माण झालेली ऊर्जेची लाट महाराष्ट्रभर पसरेल याची खात्री आहे" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"हाती घेतली मशाल, निष्ठेचा विजय झाला विशाल; हीच मशाल धगधगणार आता संपूर्ण  मुंबईभर, महाराष्ट्रभर" असं ही शेअर केलेल्या व्हि़डीओमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. निवडणुकीतील विजयानंतर ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. "हा विजय माझा नाही, पती रमेश लटकेंचा" असं म्हणत ऋतुजा यांनी मनातील खंत बोलून दाखवली. "माझ्या मनात एक खंत आहे... माझं हे दु:ख आहे की, मला माझ्या पतीच्या जागेवर निवडणूक लढवावी लागत आहे" असं म्हटलं आहे. 

 "हा विजय माझा नाही, पती रमेश लटकेंचा"; ऋतुजा लटकेंनी बोलून दाखवली खंत

"सर्वप्रथम मी म्हणेण हा विजय माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी त्यांची जी संपूर्ण राजकीय कारकीर्द होती त्यामध्ये जी जनसेवा केली, विकासकामे केली. त्याची पोचपावती ही विजयाने मिळालेली आहे. मतदारांनी त्याची एक परतफेड ही केलेली आहे" असं ऋतुजा लटके यांनी म्हटलं आहे. यासोबतच निवडणुकीत नोटांचा जास्त प्रचार झाल्याच्या मुद्य्यावर बोलताना त्यांनी "नोटाचा प्रचार हा म्हणजे त्यांनी (भाजपाने) जरी उमेदवारी मागे घेतली होती, तरी लोकांना सांगण्यात आलं आणि आपल्याकडे व्हिडिओ क्लिपही आल्या आहेत की तुम्ही नोटाला मतदान करा. नोटाचा असा प्रचार होत नसतो नोटा म्हणजे तुम्हाला कुठलाही पक्ष मान्य नाही, तेव्हा तुम्ही नोटाचं बटण दाबू शकता. त्यामुळे ही पूर्णपणे जबाबदारी मतदारांची होती आणि हा प्रश्न मतदारांना विचारला पाहिजे की, त्यांनी नोटावर का मतदान केलं?" असं म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Aaditya Thackeray tweet Over Andheri East Bypoll Election Result Rutuja Latke won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.