शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : राज्यातील कोरोना लसीच्या वितरणाबाबत आदित्य ठाकरे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 20:20 IST

CoronaVirus News : महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाबाबत टास्क फोर्सची देखील स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

ठळक मुद्देकोरोनाचा संभाव्य उद्रेक लक्षात घेता राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्गाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी, कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत. महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाबाबत टास्क फोर्सची देखील स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही एक ट्विट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून कोरोनावरील लस निर्मिती करणाऱ्या विविध कंपन्यांच्या संपर्कात आहेत. तसेच महाराष्ट्रात लसीकरण कशा पद्धतीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिली आहे. 

 

दरम्यान, कोरोनाचा संभाव्य उद्रेक लक्षात घेता राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी (RTPCR टेस्ट रिपोर्ट) अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य असेल. अहवाल निगेटिव्ह असेल त्यांनाच प्रवेश मिळेल, तर पॉझिटिव्ह असलेल्यांना कोविड सेंटरमध्ये राहावे लागेल. रिपोर्ट नसलेल्यांची टेस्ट केली जाईल. रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतूक अशा तिन्ही मार्गावरील प्रवाशांना हे निर्बंध लागू असणार आहे.

कोरोना लसीकरण प्रक्रियेत पारदर्शकता असेल - मोदीकोरोना लस सर्वात आधी कोणाला मिळणार, यावरही मोदींनी भाष्य केले. आघाडीवर राहून कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्राथमिकता द्यायला हवी. कोरोना लसीकरण प्रक्रिया पूर्ण पारदर्शकता असेल, अशी ग्वाही मोदींनी दिली. कोरोना लस एकदा द्यावी लागेल की दोनदा, त्या लसीची किंमत किती असेल, हे अद्याप निश्चित झालेले नाही, असे मोदी म्हणाले.याचबरोबर, कोरोना लसीच्या वितरणासाठी राज्यांसोबत मिळून काम सुरू आहे. लवकरच यासाठी संपूर्ण योजना तयार करण्यात येईल. कोरोना लसीकरणाची प्रक्रिया बराच काळ चालेल. त्यासाठी आपल्याला एक टीम म्हणून काम करावे लागेल, असे मोदी यांनी सांगितले. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मृत्यूदर घटला आहे. त्यामुळे अनेक जण पुरेशी काळजी घेत नाहीत. कोरोनातून बरं होता येते, असा विचार करून खूप जण बेजबाबदारपणे वागत आहेत. अशी वर्तणूक आपल्याला परवडणारी नाही, असा धोक्याचा इशारा मोदींनी दिला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAaditya Thackerayआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी