शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Aaditya Thackeray: "हे सरकार बरखास्त झालं पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे हात कोणी बांधलेले?", आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 11:36 IST

Aaditya Thackeray on Dhananjay Munde Resign: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी दबाव वाढवला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदावरून मुक्त करण्यात आलं आहे" अशी माहिती दिली. 

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारल्याची बातमी आली आहे. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की, फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही. हे सरकार बरखास्त झालं पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आपण पाहत आहे. कुठे लहान मुलींवर, महिलांवर बसमध्ये बलात्कार होत आहे. त्यावर गृहराज्यमंत्री म्हणतात हे शांततेत झालं म्हणून आम्ही काही करू शकत नाही." 

"सर्वांनीच भयंकर वर्णन केलं"

"डिसेंबरपासून हा विषय सुरू आहे. आम्ही हिच मागणी करत होतो की, पारदर्शक चौकशीसाठी आका म्हणून ज्यांचं नाव येत आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. आम्हीच नाही तर भाजपाचेच आमदार राजीनाम्याची मागणी करत होते. भाषणं झाली, प्रत्येकाने भाषणं दिली. सर्वांनीच भयंकर वर्णन केलं आहे. हे  सर्व झाल्यावर आम्हाला वाटलं होतं की मुख्यमंत्री कुठेतरी ऐकून घेतील आणि न्याय देतील."

"सरपंचाला न्याय द्या"

"मुख्यमंत्र्यांचे हात कशासाठी बांधले होते, कोणी बांधले होते?, मैत्रीच्या नात्यात बांधले होते? कोणत्या कारणामुळे बांधले होते हे आम्हाला माहित नाही. न्याय देऊ असं सांगितलं होतं. चौकशी लवकर पूर्ण होईल असं सांगितलं होतं. अधिवेशन सुरू झाल्य़ावर काल जे भयानक फोटो आले मला वाटत नाही की महाराष्ट्राने कधीही अशी हत्या पाहिली असेल. सगळेच हादरून गेले. डोळ्यात पाणी होते. कुटुंबाला काय वाटत असेल हे कळत नाही. माझं ही मन हलून गेलं आहे. सरपंचाला न्याय द्या. आपण चाललोय तरी कुठे?" असं  आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेDhananjay Mundeधनंजय मुंडेSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणBeedबीडResignationराजीनामाbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार