Aaditya Thackeray, Disha Salian Case ( Marathi News ): दिशा सालियान ( Disha Salian ) मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार आहे. दिशाचे वडिल सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता दिशा सालियानच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. 'आदित्य ठाकरे अन् रिया चक्रवर्तीचे अनेक वर्षापासूनचे संबंध होते,पार्टीच्यावेळी सालियानच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे असल्याचे डिजिटल पुरावे मिळाल्याचा दावा वकीलांनी केला.
“कितीही साफसफाई करायचा प्रयत्न केला तरी आता आदित्य ठाकरे वाचू शकणार नाही”: निलेश राणे
वकील निलेश ओझा म्हणाले, रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांचे संबंध खूप जुने आहेत.४४ वेळा यांचे एकमेकांसोबत फोन कॉल झाले आहेत. दिशा सालियान आणि सुशांतसिह राजपूत यांचा मृत्यू झाला तेव्हा या दोघांचे ४४ वेळा कॉल झाले आहेत, असा मोठा दावा वकीलांनी केला आहे.
"दिशा सालियानच्या फ्लॅटवर पार्टी दिवशी आदित्य ठाकरे उपस्थित होते. हे सिद्ध करणारे डिजिटल पुरावे आहेत. मोबाईल टॉवर लोकेशन आणि अन्य पुरावे आहेत. हे पुरावे समीर वानखेडे यांच्याकडे आहेत. आदित्य ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे, पोलीस अधिकारी हे सुद्धा आरोपी आहेत. या लोकांना कस्टडीमध्ये घ्या. हा तपास उच्च न्यायालयाच्या अख्यारीत करा. मुंबईत निष्पक्ष सुनावणी शक्य नाही. या प्रकरणाची सुनावणी सीबीआयकडे असली पाहिजे, असंही वकील म्हणाले.
या प्रकरणाची सुनावणी महाराष्ट्राच्या बाहेर व्हायला पाहिजे. १४ व्या माळ्यावरुन एखादी बॉडी पडली तर ती २५ फूट दूर कशी पडेल? हा सीन रिक्रिएट करायला पाहिजे. घटनास्थळावर पुन्हा एकदा चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वकीलांनी केली.