शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

संजोग वाघेरे यांचा भाजपा प्रवेश होताच आदित्य ठाकरेंची बोचरी टीका; म्हणाले, “सत्तेची चटक...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:52 IST

Aaditya Thackeray News: निष्ठावंत म्हणून जे आपल्यासोबत राहिले, त्यांच्यासोबत जनता असतेच. काही लोकांना या पक्षातून त्या पक्षात जाण्याची सवय लागलेली असते, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Aaditya Thackeray News: भाजपने शनिवारी उद्धवसेना आणि शरद पवार गटातील महत्त्वाच्या नेत्यांना प्रवेश देऊन दोघांना एकाचवेळी धक्का दिला. ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे, माजी नगरसेवक सचिन दोडके, पुण्यातील मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे, माजी नगरसेवक बाळासाहेब धनकवडे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी समर्थकांसह  भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, सत्तेची चटक लागलेले पटापटा पळून गेले. मात्र, सत्ता ज्यांच्याकडे आहे, त्यांच्या मागे पळण्यापेक्षा जी जनता सत्ता देते, त्यांच्या सोबत राहणे महत्त्वाचे असते. त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायचे नाही. निष्ठावंत म्हणून जे आपल्या सोबत राहिले, त्यांच्या सोबत जनता असतेच. ज्यांना गुलाम बनायचे ते जातील, जाणाऱ्यांच्या विचार करू नका. पक्षाकडून ज्यांना जास्त पदे, प्रेम आशीर्वाद मिळाले, ते सोडून गेले. त्यांना आरशात स्वतःकडे बघताना काय वाटत असेल. काही लोकांना या पक्षातून त्या पक्षात जाण्याची सवय लागलेली असते, या शब्दांत आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला.

जनता त्रस्त आहे, ते पर्याय शोधत आहेत

सरकारचे काम चांगले असते तर हेलिकॉप्टर मधून पैशांच्या बॅगा आणून पैसे वाटायची गरज पडली नसती. जनता त्रस्त आहे, ते पर्याय शोधत आहेत. गुलाम म्हणून सरकार सोबत राहिचे की जनतेसोबत राहिचे हे आता आपण ठरविले पाहिजे. पर्याय आपण दिला पाहिजे. बहुमताने सरकार आल्याचे म्हणतात, परंतु लोकांनी आमदार निवडून दिले की निवडणूक आयोगाने हा प्रश्न पडत आहे. सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रूपयांचे दिलेले आश्वासन पाळले नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही, असे सांगत महायुती सरकारवर टीका केली. 

दरम्यान, शहरीकरण वाढत असून लोकसंख्या वाढत आहे. वाढणारे तरूण शांत बसणारे नाहीत. जगभरात आंदोलनासह मतदानातून बदल होत आहे. जनता स्वच्छ लोकांना निवडेल. ती स्वच्छ लोक आपल्याकडे आहेत. बदल घडवायला आपण सगळ्यांनी तयार राहिले पाहिजे. बदल घडविण्यासाठी आत्मविश्वासाने उभे राहा. जनता तुमच्या पाठीशी उभी राहील, आशीर्वाद देईल. काही प्रभागात इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र, जिंकण्याचे गणित पाहूनच उमेदवार दिले जातील. त्यासाठी समजूतदारपणा दाखविण्याची आवश्यकता आहे. सगळेच चांगले असतात. मात्र, एकच उमेदवार निवडायचा असतो. मात्र, ज्याला उमेदवारी मिळेल, उमेदवार हा फक्त मशाल आहे हे पाहून सर्वांनी काम करावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Aaditya Thackeray criticizes Sanjog Waghere's BJP entry, calls it power hunger.

Web Summary : Aaditya Thackeray criticized leaders defecting to BJP, labeling them power-hungry. He emphasized loyalty to the public, not the ruling party, and accused the government of misusing funds and failing on promises like farmer loan waivers.
टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाsanjog waghere patilसंजोग वाघेरे पाटील