शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Aaditya Thackeray : ममता बॅनर्जींची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, "कोणतीही राजकीय चर्चा नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 21:03 IST

Aaditya Thackeray met West Bengal CM Mamata Banerjee : राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  यांच्यात ट्रायडंट हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली.

मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) प्रमुख  आणि पश्चिम बंगालच्या  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी सिद्धिविनायकाचे (SiddhiVinayak Temple) दर्शन घेतले. यानंतर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  यांच्यात ट्रायडंट हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आज मुंबईमध्ये आल्या आहेत. या अगोदर दोन-तीन वर्षांपूर्वी देखील जेव्हा त्या आल्या होत्या, तेव्हा स्वतः उद्धव ठाकरे व मी त्यांना भेटण्यासाठी आलो होतो. आता मी संजय राऊत यांच्यासोबत आलेलो आहे. अर्थातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री ममतादीदी यांच्यात एक वेगळे नाते आहे. नेहमीच दोघांमध्ये समन्वय राहिलेला आहे. आज कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. या बैठकीत औपचारिक चर्चा झाली. दोन्ही राज्यांमध्ये चांगला संवाद आहे.

याचबरोबर, स्वाभाविक होतं की त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती. मात्र, मुख्यमंत्री रुग्णालयात असल्यामुळे भेट होऊ शकली नाही. तर मी त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे. मला स्वतःहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटण्यासाठी पाठवले. मी शुभेच्छा देखील दिल्या आणि त्यांनी एक शुभ संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी दिलेला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

उद्या शरद पवारांसोबत होणार बैठकपश्चिम बंगालच्या  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील मी भेट घेणार आहेत. याबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "मला जो संदश द्यायचा आहे, तो मी देईन. मुंबईला येऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या घरी गेले नाही असं शक्य नाही. त्यामुळे मी शरद पवार यांच्या घरी उद्या जाणार आहे".

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAaditya Thackerayआदित्य ठाकरेSanjay Rautसंजय राऊत