शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

मुंबईतील विरोधकांच्या बैठकीत मीठाचा खडा! एका व्यक्तीला पाहिले अन् काँग्रेसच्या चेहऱ्याचे रंग उडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 12:57 IST

फोटो सेशनपूर्वी उद्धव ठाकरेंकडे तक्रार, अब्दुल्ला-अखिलेशनी समजवायचा प्रयत्न केला, अखेर राहुल गांधीना स्पष्ट करावे लागले... INDIA च्या बैठकीतील रुसवे फुगवे... 

मुंबईत विरोधकांची बैठक सुरु झाली आहे. आज लोगोचे अनावरण करण्यात येणार होते, परंतू त्यावर आक्षेप घेतल्याने रद्द करण्यात आले आहे. मोदी सरकारविरोधात काय करता येईल याची चर्चा, जागावाटप, संयोजक आदी गोष्टी ठरविण्यात येणार आहेत. परंतू, या बैठकीत एका व्यक्तीला पाहून मोहभंग, रुसवे फुगवे झाल्याचे चित्र दिसले आहे. 

काँग्रेसमधील एकेकालचे दुसऱ्या गटातील नेते आता सपामध्ये गेलेले कपिल सिब्बल आजच्या बैठकीला हजर आहेत. या बैठकीला सिब्बल येतील हे काँग्रेस नेत्यांना माहिती नव्हते. त्यांची अचानक एंट्री पाहून काँग्रेस नेत्यांच्या चेहऱ्यावरील रंग उतरला होता. कारण सिब्बलांना अधिकृत निमंत्रण नव्हते. त्यातच गटबाजी यामुळे तिथे उपस्थित काँग्रेस नेत्यांना सिब्बलांची उपस्थिती असहज करून गेली. फोटो काढताना काही नेते सिब्बलांच्या उपस्थितीमुळे नाराज दिसले. याबाबतचे वृत्त आजतकने दिले आहे.  

काँग्रेस नेते के. सी वेणुगोपाल यांनी फोटो काढण्यापूर्वीच सिबल्लांच्या अचानक येण्याची तक्रार उद्धव ठाकरेंकडे केली. फारुक अब्दुल्ला आणि अखिलेश यादवांनी वेणुगोपाल यांना समजविण्याचा प्रय़त्न केला. राहुल गांधी यांनी देखील आपल्याला कोणापासून समस्या नसल्याचा खुलासा केला आहे. यानंतरच सिब्बल यांना फोटो सेशनमध्ये घेण्यात आले आणि नंतर बैठकीला घेतले गेले. 

कपिल सिब्बल यांनी काँग्रेस सोडून मे 2022 मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेस नेतृत्वावर ते बराच काळ नाराज होते. सिब्बल यांची गणना काँग्रेसच्या अशा नेत्यांमध्ये होत होती जे पक्षाला सर्वाधिक देणगी देत ​​असत. सिब्बल पंजाबी ब्राह्मण समाजातून असून दिल्लीच्या राजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीkapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरे