शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 11:21 IST

लाडकी बहीण योजनेमुळे अनुदानाचे पैसे मिळतील की नाही याचा भरवसा नाही असं विधान गडकरींनी केल्यानं विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली गेली. मात्र या योजनेवरून विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. काहीजण या योजनेविरोधात कोर्टातही गेलेत. महायुतीची ही योजना महिला मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार असल्याचं विरोधक सांगतात. आता या योजनेवरूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या एका विधानाने सरकारचीच कोंडी झाली आहे. राज्य सरकार पैशांचा अपव्यय करतंय, केंद्राची काही जबाबदारी आहे की नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. 

गडकरींच्या या विधानावर संजय राऊत म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही बहिणींसाठी नसून उद्याच्या निवडणुकीत शिंदे गटाला मत मिळवण्याची योजना आहे, मते विकत घेण्याची योजना आहे. लाडक्या बहिणीवर फार प्रेम उफाळून आले असे नाही. त्यासाठी इतर सर्व योजनांचे, प्रकल्पांचे पैसे या फक्त एका लाडकी बहीण योजनेकडे वळवले आहेत. या योजनेवरून सत्तेतल्या तिन्ही गटात मारामाऱ्या सुरू आहेत. देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या लाडक्या बहिणीचा डेटा घेऊन त्यांना पत्र पाठवलं, त्यात मुख्यमंत्री हा शब्दच वगळला आहे. गडकरी म्हणतायेत ते बरोबर आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच जर अशाप्रकारे पैशाचा अपव्यय सुरू असेल. तिजोरीत पैसे नसताना इतर योजना बंद केल्या जात असताना केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही. केंद्र सरकारचं वित्त मंत्रालय, गृह मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालय यांचे काही कर्तव्य आहेत की नाही. देशाचं आर्थिक नियोजन करताना कुठेही आर्थिक बेशिस्त असता कामा नये तरच हा देश पुढे जाईल. नितीन गडकरी हे ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांनी या विषयावर केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडायला हवा असा टोलाही राऊतांनी भाजपाला लगावला आहे.

महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती चिंतेची बाब

नितीन गडकरींना आमच्या सर्वांपेक्षा नक्कीच आतमधली जास्त माहिती असणार आहे. त्यामुळे नितीन गडकरी जे बोलतात. महाराष्ट्रातील जे नेते महायुतीसोबत होते राज ठाकरे हेदेखील तेच बोलले होते. सातत्याने अनेक चॅनेल आणि वर्तमानपत्रात जे अर्थतज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून वारंवार महाराष्ट्राची जी आर्थिक परिस्थिती आहे ती अडचणीत असल्याचं सांगितले जाते. जर सरकारमधील लोक असे बोलत असतील तर ही अतिशय चिंतेची बाब आहे. अनेक महिने जयंत पाटील हे बोलत होते. डिसेंबरच्या अधिवेशनातही जयंत पाटील सविस्तर बोललेत. महाराष्ट्राचं अर्थखाते अनेकवेळा आक्षेप घेते मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. रेटून निर्णय घेतले जातात. गेल्या ५ दशकापासून महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती चांगली राहिली आहे. पहिल्यांदाच अशी भीषण परिस्थिती उद्धभवली आहे त्याला महाराष्ट्रातलं ट्रिपल इंजिन सरकार आहे असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.

काय म्हणाले नितीन गडकरी?

नागपूर येथील एका कार्यक्रमात नितीन गडकरींनी लाडकी बहीण योजनेवर त्यांच्या शैलीत भाष्य केले. गडकरी म्हणाले की, सरकारच्या भरवशावर राहू नका, कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी त्यांना दूर ठेवा. सरकार विषकन्या असते ज्याच्यासोबत जाते त्यांना बुडवते. त्यामुळे जे काही अनुदान मिळते ते घेऊन टाका पण कधी मिळेल, केव्हा मिळेल याचा भरवसा नाही. अनुदान मिळेल की नाही माहिती नाही. लाडकी बहीण योजना आली आहे. त्यामुळे अनुदानाचा पैसा तिथेही द्यावा लागतो असा सल्ला त्यांनी गुंतवणूकदारांना दिला. त्यावरून विरोधकांनी सरकारला टीकास्त्र सोडलं आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाSupriya Suleसुप्रिया सुळेSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा