शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

महायुतीसमोर आव्हानांची मालिका; विस्तारापासून अनेक निर्णय होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 06:55 IST

राज्याच्या मंत्रिमंडळात नवे चेहरे; महामंडळांवरील नियुक्त्यांची शक्यता 

मुंबई : लोकसभा निकालात १५० विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी पुढे असल्याचे समोर आल्यानंतर महायुतीची चिंता वाढली आहे. पाच महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवायची तर अनेक निर्णय महायुतीला करावे लागणार आहेत. त्यात कोणाच्या नेतृत्वात आगामी निवडणूक लढणार याची अधिकृत घोषणा करणे, पराभवामुळे झालेली नाराजी शमविणे, तिन्ही पक्षांना न्याय देऊ शकेल असा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणे, अशी आव्हाने महायुतीसमोर आहेत.

 लोकसभा निवडणुकीत जागावाटपाचा घोळ झाल्याने निकालावरही त्याचा परिणाम झाला. ती चूक विधानसभेला होऊ नये याची काळजी आम्ही नक्कीच घेऊ, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जागावाटपाची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणाच्या आधारे काही खासदारांना तिकिटे नाकारण्यासाठी भाजपने दबाव आणला, असा आरोप शिंदेसेनेच्या नेेत्यांनी केला होता. यावेळी हा वादच उद्भवू नये याची काळजी घेतली जाणार आहे. 

मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यताराज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता आहे. एक-दोन आठवड्यात हा विस्तार झाला तर नवीन मंत्र्यांना काम करण्यासाठी तीन-साडेतीन महिनेच मिळतील. कारण त्यानंतर लगेच निवडणूक आचारसंहिता लागेल. विभागीय, जातीय संतुलन हे दोन घटक समोर ठेवूनच विस्तार केला जाईल, असे मानले जात आहे.राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या मुख्यमंत्र्यांसह ४३ इतकी राहू शकते. सध्या २९ मंत्री आहेत. याचा अर्थ आणखी १४ जणांना संधी दिली जाऊ शकते. शिंदेसेनेचे मंत्री संदीपान भुमरे औरंगाबादमधून निवडून आले आहेत, त्यामुळे ते मंत्रिपदाचा आणि आमदारकीचाही राजीनामा देतील. त्यामुळे आणखी एका मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो.विविध महामंडळे आणि समित्यांवरील नियुक्त्यांचा निर्णय लवकरच होईल अशीही शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. 

शिदेंच्या नेतृत्वातच विधानसभा लढणार?फडणवीस यांच्यासह भाजप व मित्रपक्षांचे नेतेही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच विधानसभेची निवडणूक आम्ही लढवू, असे सांगत आहेत. भाजपचे दिल्लीतील नेतृत्व तिन्ही पक्षांच्या राज्यातील नेत्यांशी चर्चा करून अधिकृतपणे तशी घोषणा करेल, अशी शक्यता आहे.

भाजपमध्ये बदल होतील का? प्रदेश भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बदलणार का याबाबतही उत्सुकता आहे. फडणवीस यांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी त्यांना सरकारमध्ये राहून काम करण्याची सूचना केंद्रीय नेतृत्वाने तूर्त केलेली आहे.फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची शुक्रवारी भेट घेऊन चर्चाही केली. परंतु, केंद्रीय नेतृत्वाने त्यांना तूर्तास उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ नका, असा सल्ला दिला. आगामी विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप करून तयारीला लागा, असे निर्देशही पक्षनेतृत्वाने त्यांना दिल्याचे कळते.बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवले तरी त्यांच्यासोबतचे काही पदाधिकारी बदलले जाऊ शकतात. काही नवीन चेहरे दिले जातील असे म्हटले जाते. लोकसभा निवडणुकीतील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्याबाबतचा निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४