शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

हातगाडीवरून गर्भवती पोहचली रूग्णालयात; पनवेलमध्ये आरोग्यसेवेचा भोंगळ कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 10:18 IST

मोटारसायकलला हातगाडी बांधून त्यात पत्नीला बसवून आसूडगाव ते उपजिल्हा रुग्णालय असा जीवघेणा प्रवास केला

भालचंद्र जुमलेदार

नवी मुंबई : पनवेल महापालिका क्षेत्रात डोंबारीचा खेळ करणाऱ्या डोंबारणीला प्रसूतिवेदना सुरू झाल्यानंतर रुग्णवाहिका न मिळाल्याने चक्क मोटारसायकलीला हातगाडी बांधून दवाखान्यात न्यावे लागण्याची घटना घडली आहे. देशाची  आर्थिक राजधानी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबविली, उल्हासनगर या महानगरांच्या वेशीवर असलेल्या शहरातील आरोग्यसेवेचा भाेंगळ कारभार यामुळे उघड झाला असून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आसूडगाव येथील डोंबारीचा खेळ करणाऱ्या गरोदर महिलेला सोमवारी रात्री प्रसूतिवेदना सुरू झाल्याने तिच्या नवऱ्याने माहितीतील आशा वर्करला फोन केला होता.  त्यांनी ॲम्ब्युलन्ससाठी फोन नंबर दिला; परंतु, समोरच्या व्यक्तीने प्रतिसाद दिला नाही. यामुळे काेणताही पर्याय नसल्याने त्याने मोटारसायकलला हातगाडी बांधून त्यात पत्नीला बसवून आसूडगाव ते उपजिल्हा रुग्णालय असा जीवघेणा प्रवास केला. त्यानंतर नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयामध्ये महिलेला दाखल करण्यात आले. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. पनवेलनजीकच्या शहरातच ही गंभीर घटना घडल्याने स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. संबंधित महिला मूळची छत्तीसगढमधील रहिवासी आहे. जुलै महिन्यात ती पनवेलमध्ये आली. त्यानंतर तिची आशा सेविकांमार्फत नियमित तपासणी केली जात होती. 

पनवेलमधील स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या घटनेशी संबंधित अहवाल माझ्याकडे आल्यावर या घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात येईल.- डॉ. अंबादास देवमाने (जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड)

टॅग्स :Healthआरोग्य