शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांना एक मेसेज अन् नेपाळमध्ये अडकलेले ५८ भाविक महाराष्ट्रात सुखरूप परतले, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 14:27 IST

Devendra Fadnavis: देवदर्शनासाठी गेलेले महाराष्ट्रातील तब्बल ५८ भाविक पर्यटन कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नेपाळमध्ये अडकून पडले होते. या पर्यटकांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका मेसेजद्वारे माहिती मिळाल्यानंतर वेगाने सुत्रं फिरून सर्वांची सुखरूप सुटका झाली.

नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेलेले महाराष्ट्रातील तब्बल ५८ भाविक पर्यटन कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नेपाळमध्ये अडकून पडले होते. संपत आलेले खिशातील पैसे आणि पर्यटन कंपनीने हात वर करत नेपाळमध्येच अडकवून ठेवल्याने त्यांना सुटकेचा मार्ग दिसत नव्हता. या भाविकांनी मदतीसाठी अनेकांना फोन लावले मात्र त्याचाही उपयोग होत नव्हता. यादरम्यान या पर्यटकांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका मेसेजद्वारे माहिती मिळाली. त्यानंतर मात्र वेगाने सूत्रं फिरून हे भाविक नेपाळमधून सुखरूपपणे उत्तर प्रदेशात आणि तिथू महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील आपल्या गावांमध्ये पोहोचले. या प्रसंगातून सुटका झाल्यानंतर भाविकांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. 

नेपाळमध्ये अडकलेल्या भाविकांपैकी एक असलेल्या संजू म्हात्रे यांनी सांगितले की, आम्ही  रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कामोठे गावातील ५८ जण नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनासाठी गेले होते. यामध्ये ३५ महिला आणि २३ पुरुषांचा समावेश होता. गोरखपूरहून नेपाळपर्यंत आम्ही व्यवस्थित पोहोचलो. तेथील लुंबीनी, पोखरा, जनकपुरी, मनोकामना य़ेथील मंदिरांचं दर्शन घेतलं. मात्र, काठमांडूला आल्यावर आम्हाला राधाकृष्ण ट्रॅव्हल्सच्या एका बसमध्ये कोंबण्यात आलं. आम्ही गावाहून निघतानाच सर्व पैसे भरलेले होते. मात्र, तिथे आमची फसवणूक झाली. तुमच्या पर्यटन कंपनीकडून पैसे आले नाहीत. सहा लाख रुपये दिले नाहीत तर सोडणार नाही, अशी धमकी या ट्रॅव्हल्सचा मालक अंकीत जायस्वाल आणि त्याच्या साथीदारांनी दिली. तसेच आम्हाला धमकावण्यास सुरूवात केली. परक्या देशात उद‌्भवलेल्या या प्रसंगामुळे काय करायचे? हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला. आम्ही ओळखीच्या लोकांमार्फत नेत्यांना आणि त्यांच्या पीएंना फोन करायला सुरुवात केली. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेना. शेवटी मी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर फडणवीस यांनी तातडीने प्रतिसाद आला. त्यांनी माहिती घेतली. लगेचच फडणवीस यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि  दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंडे यांनी या भाविकांशी संपर्क साधला.

देवेंद्र फडणवीस यांच्या टीमने मूळचे नेपाळचे असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे माजी स्वीय सहायक  संदीप राणा यांना कळविले. राणा यांनी स्वत: या भाविकांची भेट घेतली व  सर्व भाविकांची व्यवस्था करून विशेष बसने त्यांना गोरखपूरला पोहोचविले. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे भाविक गोरखपूरला पोहोचल्यावर तेथील जिल्हाधिकारी स्वत: भेटीला आले. त्यांनी दोन दिवस भाविकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली. त्यांना मुंबईपर्यंत कसे न्यायचे प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून गोरखपूरपासून मुंबईपर्यंत खास बोगी जोडण्याची विनंती केली. रेल्वेने त्याप्रमाणे भाविकांसाठी गोरखपूरहून मुंबईपर्यंत रेल्वेची एक बोगी आरक्षित करून दिली. दोन दिवस प्रवास करून सर्व जण अखेर सुखरुपपणे मुंबईला पोहोचले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसtourismपर्यटनNepalनेपाळIndiaभारत