तेलंगणातील पाच जहाल माओवाद्यांसाठी चक्रव्यूह! ५ माओवादी ‘हिटलिस्ट’वर

By संजय तिपाले | Updated: April 12, 2026 10:17 IST2026-04-12T10:17:11+5:302026-04-12T10:17:52+5:30

Maoists News: माओवाद्यांच्या पीएलजीएचा (पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी) जहाल कमांडर सोडी केशालू ऊर्फ मल्ला याच्यासह ४२ सहकाऱ्यांनी तेलंगणात ऐतिहासिक आत्मसमर्पण केले.

A maze for five fierce Maoists in Telangana! | तेलंगणातील पाच जहाल माओवाद्यांसाठी चक्रव्यूह! ५ माओवादी ‘हिटलिस्ट’वर

तेलंगणातील पाच जहाल माओवाद्यांसाठी चक्रव्यूह! ५ माओवादी ‘हिटलिस्ट’वर

- संजय तिपाले
गडचिरोली -  माओवाद्यांच्या पीएलजीएचा (पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी) जहाल कमांडर सोडी केशालू ऊर्फ मल्ला याच्यासह ४२ सहकाऱ्यांनी तेलंगणात ऐतिहासिक आत्मसमर्पण केले. त्यामुळे तेलंगणा माओवादमुक्त घोषित केेले आहे. मात्र, अजूनही मूळचे तेलंगणातील पाच मोस्ट वाँटेड जहाल माओवादी सक्रिय असून, ते सध्या दंडकारण्यातील छत्तीसगडच्या बस्तरमधल्या घनदाट जंगलात दडून बसल्याचा कयास आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना  घेरण्यासाठी आता सुरक्षा यंत्रणांनी चक्रव्यूह आखले आहे.

माओवाद्यांनी आजवर छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यांच्या सीमांचा  फायदा घेत पळवाट सुरक्षित ठेवली होती. मात्र, आता या पाचही राज्यांच्या पोलिसांनी सीमा पूर्णपणे सील केल्या आहेत. सुरक्षा दलांनी जंगलात ३०हून अधिक नवी पोलिस ठाणे उभारल्याने माओवाद्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत.

५ माओवादी ‘हिटलिस्ट’वर
सुरक्षा यंत्रणांच्या ‘हिटलिस्ट’वर असलेल्या या पाच जणांमध्ये चळवळीचा मास्टरमाइंड मुप्पला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती, जहाल महिला कमांडर रूपी, चंदर, मल्लेश आणि अन्य एकाचा समावेश आहे. गणपती  हा हिंसक चळवळीचा मेंदू असून, देशातील सर्वांत जहाल माओवाद्यांपैकी एक आहे. त्याने नेपाळ किंवा फिलिपिन्समध्ये आश्रय घेतल्याच्याही चर्चा होत्या. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. 

एकीकडे जवानांचा वेढा, दुसरीकडे कडक इशारा
या पाच माओवाद्यांसाठी बस्तरमध्ये  कोब्रा, सीआरपीएफ आणि डीआरजी  जवानांनी  अबुझमाडच्या जंगलाला घातलेला वेढा अधिक घट्ट केला आहे. ड्रोनद्वारेही त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.  दुसरीकडे बस्तरचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी  शेवटचे आवाहन केले आहे. ‘तुमचे साथीदार मारले गेलेत, नेते शरण आलेत. आता तुमच्याकडे फक्त ७२ तास आहेत.

Web Title : तेलंगाना में शीर्ष माओवादियों पर शिकंजा: सुरक्षा बलों का घेराव सख्त

Web Summary : तेलंगाना माओवाद मुक्त हुआ, पर पांच वांछित नेता बाकी हैं। सुरक्षा बलों ने सीमाएं सील कीं, गश्त बढ़ाई। छत्तीसगढ़ के जंगलों में छिपे कमांडरों को पकड़ने पर ध्यान केंद्रित है। 72 घंटे में आत्मसमर्पण का अल्टीमेटम दिया गया।

Web Title : Tightening Net: Security Forces Target Five Top Maoists in Telangana

Web Summary : Telangana is Maoist-free after key surrenders, but five wanted leaders remain. Security forces have sealed borders and increased patrols, focusing on capturing or neutralizing these top commanders hiding in Chhattisgarh's forests. A 72-hour surrender ultimatum has been issued.