आजरा तहसिलमधील महिला अधिकाऱ्याचा कार्यालयातच हृदयविकाराने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 16:19 IST2022-08-29T16:18:54+5:302022-08-29T16:19:03+5:30
आजरा तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून अंजना सर्जेराव पाटील ( वय ५२ रा. बिरदेवनगर, सरकारी दवाखानाशेजारी निपाणी - कर्नाटक ) या महिला अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कार्यालयात मृत्यू झाला आहे.

आजरा तहसिलमधील महिला अधिकाऱ्याचा कार्यालयातच हृदयविकाराने मृत्यू
आजरा :
आजरा तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून अंजना सर्जेराव पाटील ( वय ५२ रा. बिरदेवनगर, सरकारी दवाखानाशेजारी निपाणी - कर्नाटक ) या महिला अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कार्यालयात मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी १०.१५ वा.च्या सुमारास घडली.
दोन दिवसांची सुट्टी संपवून तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून अंजना पाटील या निपाणी येथून आज कामावरती आल्या होत्या. त्यांनी कामाला सुरुवात करण्यापूर्वीच त्यांना हृदय करायचा तीव्र धक्का बसला. त्यांना तहसिलदार विकास अहिर, निवडणूक नायब तहसिलदार डी.डी. कोळी यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने तहसिलदार यांच्या वाहनातून आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना तहसिल कार्यालयासह सर्व महसूल कर्मचाऱ्यांना समजताच ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. दुपारी अंजना पाटील यांचे नातेवाईक आजऱ्यात आल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, सून असा परिवार आहे.