शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या दौऱ्यात गोंधळाचे प्रकरण; पीएफआयविरोधात छापे; मुंबई-ठाण्यासह देशभरात कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 06:34 IST

अब्दुल वाहिद शेख हा विक्रोळी येथील पार्कसाइट परिसरातील एका चाळीत राहतो. छापे टाकण्यासाठी एनआयएचे अधिकारी व पोलिस यांचे संयुक्त पथक पहाटे पाच वाजता त्याच्या घरी पोहोचले. 

मुंबई/नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या वर्षी बिहार दौऱ्यात गोंधळ घालण्याचा गुन्हेगारी कट रचल्याबद्दल राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) सदस्यांविरुद्ध सहा राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

एनआयएच्या पथकाने महाराष्ट्रातील मुंबईतील विक्रोळी भागातील अब्दुल वाहिद शेख याच्या घरावरही छापा टाकला. ठाण्याच्या राबोडीतील शाहीद नेरकर या सिमीच्या माजी सदस्यावरही अधिकाऱ्यांनी छापे टाकले. त्याला २००३ मध्ये एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. एनआयएच्या मुंबई आणि लखनऊ येथील अधिकाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली असून त्यातून लॅपटॉप, कॉम्प्युटर तसेच काही डिजिटल पुरावे मिळाल्याचा दावा एनआयएने केला, तसेच साडेआठ लाख रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांना सहा तास ताटकळवले - अब्दुल वाहिद शेख हा विक्रोळी येथील पार्कसाइट परिसरातील एका चाळीत राहतो. छापे टाकण्यासाठी एनआयएचे अधिकारी व पोलिस यांचे संयुक्त पथक पहाटे पाच वाजता त्याच्या घरी पोहोचले. 

- मात्र, त्याने सहा तास घराचा दरवाजाच उघडला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना ताटकळत उभे राहावे लागले. त्याने अधिकाऱ्यांकडे वॉरंट आहे का, अशी विचारणाही केली.

कुठे टाकले छापे? महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू, दिल्लीसह  इतर राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले. राजस्थानमधील टोंक, कोटा, गंगापूर आणि नवी दिल्लीतील हौज काझी, बल्लीमारन येथेही छापे टाकण्यात आले. 

संशयित वृद्धाची ७ तास चौकशीमध्य प्रदेशातील भोपाळच्या खानू गावात एनआयएने बुधवारी सकाळी छापा टाकून एका वृद्धाला ताब्यात घेतले. पीएफआयसोबत असलेल्या त्याच्या संपर्कातून तपास यंत्रणेला इनपूट मिळाले आहेत.

दहशतवादी लखबीर सिंगची जमीन हाेणार जप्तमोहाली येथील एनआयए कोर्टाने पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील कुख्यात दहशतवादी आणि खलिस्तान लिबरेशन फ्रंटचा पाकस्थित स्वयंघोषित प्रमुख लखबीर सिंग ऊर्फ रोडे याच्या मालकीची जमीन जप्त करण्याचे आदेश दिले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाPoliceपोलिस