शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 10:20 IST

"...यातून राहुल गांधींची संकुचित वृत्ती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधातील मानसिकता दिसून येते. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही." 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातच, संविधानाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापताना दिसत आहे. भाजप आणि काँग्रेस संविधानाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा समोरा-समोर आले आहेत. राहुल गांधी यांनी नुकतेच 'संविधानाचे पुस्तक' दाखवल्यानंतर, भाजपने काँग्रेसवर 'कोरे संविधान' म्हणत निशाना साधला होता. यानंतर आता, भाजपने एक व्हिडिओ शेअर करत, "नागपुरात राहुल गांधी यांनी कोरं संविधान दाखवून संविधानाचा अवमान केला... आणि मुंबईत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्याचं सौजन्यही दाखवायचं नाही. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही," असे लिहीत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

यासंदर्भात 'भाजपा महाराष्ट्र'ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक व्हडिओ शेअर करत लिहिले आहे, "नागपुरात राहुल गांधी यांनी कोरं संविधान दाखवून संविधानाचा अवमान केला तर मुंबईत संविधानाचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा द्वेष दिसून आला. आधी संविधानाचा अपमान करायचा आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्याचं सौजन्यही दाखवायचं नाही. यातून राहुल गांधींची संकुचित वृत्ती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधातील मानसिकता दिसून येते. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही." 

 

'भाजपा महाराष्ट्र'चा 'कोरे' संविधान म्हणत राहुल गांधींवर आरोप - तत्पूर्वी, 'भाजपा महाराष्ट्र'ने एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत, 'कोरे' संविधान दाखवत, "संविधान सिर्फ बहाना है, लाल पुस्तक को बढ़ाना है, मोहब्बत के नाम पर, सिर्फ नफरत फैलाना है..." असा आरोप राहुल गांधींवर केला होता. तसेच, "काँग्रेसला भारताचे संविधान असेच कोरे करायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सर्व कायदे अनुच्छेद वगळून टाकायचे आहेत. म्हणूनच तर राहुल गांधींनी मध्यंतरी आरक्षण रद्द करणार ही भविष्यवाणी केली होती. राहुल गांधी लक्षात ठेवा, श्रध्देय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान हा निवडणुकीचा मुद्दा नाही तर भारताचा आणि भारतीयांच्या जगण्याचा पाया आहे. त्यामुळे संविधान विरोधी कॉग्रेसला जनताच धडा शिकवेल...," असे म्हटले होते.

निळ्या रंगाऐवजी त्या घटनेच्या प्रतीला लाल कव्हर... -याशिवाय, देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. "एकीकडे घटनेची प्रत उंचावून दाखवायची आणि दुसरीकडे अराजकतावादी शक्तींच्या पाशात अडकायचे. संविधानाचा आग्रह एकीकडे धरायचा आणि दुसरीकडे या संविधानाला मूठमाती देऊ पाहणाऱ्या शक्तींना गोंजारायचे, अशी बेगडी वृत्ती त्यातून दिसते. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या विचारांना केव्हाच बगल दिली असून ते पूर्णपणे अर्बन नक्षल्यांच्या अविचाराने घेरले गेले आहेत. घटनेची प्रत ते अनेक प्रसंगांमध्ये दाखवतात. नेहमीच्या निळ्या रंगाऐवजी त्या घटनेच्या प्रतीला लाल कव्हर लावलेले असते. अराजकतावादी आणि अर्बन नक्षलवाद्यांनी राहुल गांधी यांना घेरले आहे. त्यांनी भारत जोडो यात्रा काढली तेव्हा असे वाटले होते की चला! काही नाही तर भारत जोडायला तरी निघाले आहेत पण प्रत्यक्षात काय घडले? त्यांच्या यात्रेमध्ये १८० संघटना अशा होत्या, ज्या विध्वंसक मानल्या जातात, हे मी म्हणतो म्हणून नाही तर ते रेकॉर्डवर आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस