शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी समर्पित मागासवर्ग आयोग नेमणार; अशोक चव्हाणांची विधान परिषदेत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 09:08 IST

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी नेमण्यात येणाऱ्या समर्पित बांठिया समितीचा अहवाल आल्यानंतर नक्कीच हे आरक्षण न्यायालयात टिकेल, असा विश्वास इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या चर्चेला उत्तर देताना व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्भवलेली परिस्थिती आणि माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी समर्पित मागासवर्ग आयोग नेमण्यात येईल, अशी घोषणा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत केली. विनायक मेटे यांनी मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले. मराठा समाजाचे मागासलेपण जलदगतीने सिद्ध करण्यासाठी वेगळा मागासवर्ग आयोग नेमण्यात येईल. या आयोगातील विद्यमान सदस्यांना कायम ठेवायचे की नव्याने सदस्यांची नियुक्ती करायची, याबाबतची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. गायकवाड समितीच्या अहवालात ज्या त्रुटी राहिल्या त्या पुन्हा राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी नेमण्यात येणाऱ्या समर्पित बांठिया समितीचा अहवाल आल्यानंतर नक्कीच हे आरक्षण न्यायालयात टिकेल, असा विश्वास इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या चर्चेला उत्तर देताना व्यक्त केला.संभाजीराजेंना संसदेत का बोलू दिले नाही?खा. संभाजीराजे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जी तत्परता दाखविली त्याच तत्परतेने त्यांना संसदेत बोलू द्यायला हवे होते. घटनादुरुस्तीवेळी देशभरातील सदस्य बोलले. पण, संभाजीराजेंना बोलू दिले गेले नाही. त्यावर गदारोळ झाला तेव्हा थोडावेळ बोलू दिले गेले, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. nमराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारच्या काळात जे वकील होते तेच कायम केले. उलट नव्याने अधिकचे वकील दिले. मराठा संघटनांनीही निष्णात वकील दिले होते, तरीही महाविकास आघाडी सरकारने हे आरक्षण टिकवण्यासाठी काहीच केले नाही, असा समज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. चुकीचे नरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रकार आहे.मागासलेपणासोबतच ५०% मर्यादेचा विषयकेंद्र सरकारने  ५० टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल केली असती, तर मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर झाला असता. मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व निर्णय कायद्याच्या चौकटीत राहूनच घ्यावे लागतात. आताही मागासलेपणा सिद्ध केल्यानंतर, ५० टक्के मर्यादेचा विषयही सोडवावा लागणार आहे. त्यावेळी विरोधकांनी केंद्र सरकारकडे याबाबत एकत्र यायला हवे, असे चव्हाण म्हणाले. आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजासाठी लागू केलेल्या कोणत्याही सवलती बंद केलेल्या नाहीत. सवलतींसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMaratha Reservationमराठा आरक्षण