शहरं
Join us  
Trending Stories
1
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
2
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
3
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
4
इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
5
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
6
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
7
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
8
भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
9
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
10
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
11
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
12
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
13
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
14
तुम्ही दुबार मतदार असाल तर सादर करावे लागणार २ पुरावे; मतदान केंद्रावर हमीपत्र लिहून घेतले जाणार
15
अंबरनाथ, बदलापूरमध्ये स्वीकृत नगरसेवकपदावरून वादाची ठिणगी; शिंदेसेनेचे पारडे झाले जड
16
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
17
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
18
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
19
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
20
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
Daily Top 2Weekly Top 5

पहिलीपासून हिंदी सक्ती ९८ टक्के लोकांना नकोच! त्रिभाषा धोरण समितीच्या जनसंवादात विरोधाचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 06:24 IST

'पहिलीपासून हिंदी सक्तीची त्रिभाषा धोरण : महाराष्ट्रद्रोही राजकारण' ही पुस्तिका कार्यशाळेदरम्यान, मराठी अभ्यास केंद्राने वाटली.

मुंबई - त्रिभाषा धोरण समितीच्या आठव्या जनसंवाद कार्यशाळेत ९८ टक्के नागरिकांनी पहिलीपासून हिंदी सक्तीला कडाडून विरोध दर्शवला. तसेच पाचवीपासून हिंदी असावे, असे ठाम मतही व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित या कार्यशाळेसाठी शिक्षक, विद्यार्थी अभ्यासक, साहित्यिक, मुख्याध्यापक व संस्थाचालकांसह मुंबईतील ४०० हून अधिक नागरिक उपस्थित होते.

सूचना आणि शिफारशी देण्यासाठी अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. सर्व सूचनांचे विश्लेषण २० डिसेंबरपर्यंत करून ५ जानेवारी पर्यंत अहवाल शासनाकडे सुपूर्द केला जाईल. १२ कोटी जनतेपैकी केवळ १० हजार प्रश्नावल्या व १,२०० मतावल्या प्राप्त झाल्या, अशी माहिती डॉ. नरेंद्र जाधव यांनी दिली. 'जय जय महाराष्ट्र माझा' या गीताने कार्यशाळेला सुरुवात झाली.

सूचनांवर विचार ही समाधानाची बाब : मनसे

आजकाल सरकार नागरिकांना विचारत नाही, परंतु ही समिती त्यांच्या सूचना लक्षात घेत आहे. हे पाहून बरं बरे वाटते, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी सरकारवर निशाणा साधला. तर विद्यार्थ्यांना पाचवीपासून तिसरी भाषानिवडीचे स्वातंत्र्य असावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

विद्यार्थी काय म्हणाले?दहावीपर्यंत मराठी सक्ती असावी, असे सेंट कोलंबस विद्यालयातील सार्थकी घुगे म्हणाली, तर सार्थकी घुगे, श्रेया जोंधळे यांनी तिसरीपर्यंत संवादात्मक हिंदी असावी, असे मत मांडले. बाल मोहनच्या आर्या भगतने पहिलीपासून संस्कृत सूचना केली.

हिंदी सक्तीसाठी दबाव नाही : डॉ. नरेंद्र जाधव

'पहिलीपासून हिंदी सक्तीची त्रिभाषा धोरण : महाराष्ट्रद्रोही राजकारण' ही पुस्तिका कार्यशाळेदरम्यान, मराठी अभ्यास केंद्राने वाटली. समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी मात्र, पहिलीपासून हिंदी सक्तीचा कोणताही विचार समितीसमोर नाही. काही जण याबाबत धादांत खोटा आरोप करीत आहेत, असा दावा केला.

'पहिलीपासून हिंदी' अजूनही प्रयत्न : डॉ. पवार

'पहिलीपासून हिंदी' हा प्रयत्न सुरू असून, समितीने त्याला बळी पडू नये. हिंदी सक्तीचा निर्णय जनतेच्या व विरोधी पक्षांच्या विरोधामुळेच मागे घेतला. त्यामुळे पुस्तिकेला 'खोटा प्रचार म्हणणे योग्य नाही. असे मराठी अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. दीपक पवार म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : 98% Oppose Hindi Compulsion From First Grade: Tri-Language Policy Meet

Web Summary : 98% of citizens strongly opposed making Hindi compulsory from first grade at a tri-language policy workshop. Participants suggested Hindi from fifth grade. Concerns raised about potential Hindi imposition. Marathi language focus advocated.
टॅग्स :hindiहिंदीmarathiमराठी