चलनातून बाद झालेली ९६ लाखांची रोकड जप्त

By Admin | Updated: March 6, 2017 05:20 IST2017-03-06T05:20:50+5:302017-03-06T05:20:50+5:30

गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने खारेगाव भागातून चलनातून बाद झालेल्या एक हजार आणि पाचशेच्या ९६ लाख ९० हजार पाचशेच्या नोटा हस्तगत केल्या

9.6 lakh cash seized from the challan seized | चलनातून बाद झालेली ९६ लाखांची रोकड जप्त

चलनातून बाद झालेली ९६ लाखांची रोकड जप्त


ठाणे : येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने खारेगाव भागातून चलनातून बाद झालेल्या एक हजार आणि पाचशेच्या ९६ लाख ९० हजार पाचशेच्या नोटा हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी संजय चन्ने याला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खारेगाव, रेतीबंदर रोडवर भारतीय चलनातून रद्द झालेल्या एक हजार व पाचशेच्या नोटा घेऊन एक व्यक्ती येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांना मिळाली होती. याआधारे ३ मार्च २०१७ रोजी एका कारमधून आलेल्या चन्ने याच्याकडून एक हजार रुपये दराच्या पाच हजार २३१, तर पाचशेच्या आठ हजार ९१९ अशा ९६ लाख ९० हजारांच्या नोटा सोनसाखळी चोरीविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक मिलन पिंगळे, हवालदार बाळा भोसले, प्रदीप गायकवाड, वसंत बेलदार आणि नरसिंग क्षीरसागर आदींच्या पथकाने सापळा लावून हस्तगत केली. या कारमध्ये पाठीमागील सीटवर एका सॅकमध्ये व कापडी पिशवीतून या नोटा हस्तगत केल्याचे डोईफोडे म्हणाले. (प्रतिनिधी)
>५० टक्के कमिशन
या नोटा ५० टक्के कमिशनवर चन्ने याने एका बड्या बांधकाम व्यावसायिकाकडून घेतल्या होत्या. हा बिल्डर कोण आणि त्या नोटांचे अधिकृत विवरण आहे किंवा कसे, याची खातरजमा करण्यात येत आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: 9.6 lakh cash seized from the challan seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.