नऊ जिल्ह्यांत कोरोनाचे ९३ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्ण, उर्वरित राज्यातील प्रमाण सात टक्क्यांहून कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 04:20 AM2020-07-18T04:20:38+5:302020-07-18T07:20:13+5:30

सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या यादीत ठाणे जिल्हा आघाडीवर असून त्यापाठोपाठ पुणे आणि मुंबईचा क्रमांक आहे. याशिवाय पालघर, रायगड, सोलापूर, नाशिक, जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यातील संख्या मोठी आहे.

93 per cent of corona inactive patients in nine districts, less than seven per cent in the rest of the state | नऊ जिल्ह्यांत कोरोनाचे ९३ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्ण, उर्वरित राज्यातील प्रमाण सात टक्क्यांहून कमी

नऊ जिल्ह्यांत कोरोनाचे ९३ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्ण, उर्वरित राज्यातील प्रमाण सात टक्क्यांहून कमी

Next

मुंबई : कोरोनाचा केंद्रबिंदू आता मुंबईकडून अन्य महानगरांकडे सरकत असल्याचे चित्र आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत ठाण्यापाठोपाठ आता पुण्यानेही मुंबईला मागे टाकले आहे. एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी तब्बल १ लाख १२ हजार ३३६ रुग्ण राज्यातील नऊ जिल्ह्यांत असून उर्वरित सर्व जिल्ह्यांत मिळून फक्त ८,१४४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात ८,३०८ नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या यादीत ठाणे जिल्हा आघाडीवर असून त्यापाठोपाठ पुणे आणि मुंबईचा क्रमांक आहे. याशिवाय पालघर, रायगड, सोलापूर, नाशिक, जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यातील संख्या मोठी आहे. एकूण १ लाख २० हजार ४८० रुग्णांपैकी तब्बल १ लाख १२ हजार ३३६ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण याच नऊ जिल्ह्यांत आहेत. तर, उर्वरित महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ८ हजार १४४ इतकीच आहे. टक्केवारीच्या प्रमाणात बोलायचे तर या नऊ जिल्ह्यांतील रुग्णांचे प्रमाण ९३.२४ टक्के इतके आहे.
राज्यात शुक्रवारी ८,३०८ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ९२ हजार ५८९ झाली आहे. तर, २२१७ रुग्ण आज बरे होऊन घरी गेल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १ लाख ६० हजार ३५७ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८१ टक्के इतके आहे.
दिवसभरात झालेल्या २५८ मृत्युंपैकी मुंबई मनपा-६२, ठाणे-१२, ठाणे मनपा-९, नवी मुंबई मनपा-१४, कल्याण-डोंबिवली मनपा-१४, भिवंडी-निजामपूर मनपा-१२, मीरा-भार्इंदर मनपा-५, पालघर-१, वसई-विरार मनपा-११, रायगड-७, पनवेल मनपा-१, नाशिक-७, नाशिक मनपा-१८, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, जळगाव-३, जळगाव मनपा-१, पुणे-७, पुणे मनपा-२१, पिंपरी-चिंचवड मनपा-१७, सोलापूर मनपा-३, सोलापूर मनपा-६, सातारा-५, कोल्हापूर-२, रत्नागिरी-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-३, जालना-४, हिंगोली-१, लातूर मनपा-२, उस्मानाबाद-२, बीड-१, नांदेड-३, नांदेड मनपा-३, अमरावती मनपा-२, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.

Web Title: 93 per cent of corona inactive patients in nine districts, less than seven per cent in the rest of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.