शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम महाराजांच्या पालखीत बाभळगावच्या अश्वाची 90 वर्षाची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 16:15 IST

बाभळगाव:  "पंढरीची वारी आहे माझ्या घरी , आणिक न करी तीर्थ व्रत " या तुकोबांच्या अभंगाची प्रचिती सहज घ्यावी ...

बाभळगाव:  "पंढरीची वारी आहे माझ्या घरी , आणिक न करी तीर्थ व्रत " या तुकोबांच्या अभंगाची प्रचिती सहज घ्यावी असे परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील विनायराव नामदेवराव  गिराम यांचे वारकरी घराणे. त्यांच्या घराण्याने वारकरी संप्रदायाची परंपरा  मागील तीन पिढ्यांनी सांभाळली आहे. तुकोबांच्या पालखीसोबत निघालेला या घराण्याचा देवाचा अश्व पालखीत सहभागी होत वाटेवरील सहा  उभ्या आडव्या रिंगनात धाव घेत पांडुरंगाच्या पायथ्याशी पोहच करतो. 19 जून रोजी बाभळगाव येथून प्रस्थान झाल्यानंतर 9 जुले रोजी पंढरपूर येथे द्वादशीला अश्वाचे बाभळगावकडे प्रस्थान होते.

10 जून ला  बाभळगाव येथून प्रस्थानतुकोबांच्या देहू येथील पालखीत सहभागी होण्यासाठी बाभळगाव येथील विनायकराव नारायणराव गिराम यांचा देव अश्व  10 जून रोजी  बाभळगाव येथून प्रस्थान करण्यात आलe. 11 जून रोजी हा अश्व पंढरपूरला पोहचला, त्यानंतर 11 जून ते 19  जून या कालावधीथ 50 वारकऱ्यांसोबत पायी  चालत देहूत त्याचे आगमन झाले.  देहू येथून  20 जून  पासून तुकोबांच्या निघालेल्या पालखीसोबत मुक्काम दर मुक्काम अश्व सहभागी झाला, या काळात रिगणात धावा घेतली.

परतीच्या प्रवासानंतर गावात मिरवणूक ...दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या अश्वाची परत आल्यानंतर बाभळगाव गावात मिरवणूक काढून श्रद्धा भावाने पूजा करतात आणि त्यानंतर रनेर कुटुंबाकडून अश्वाची वर्षभर देवा सारखी पूजा होते.  कोरोणाच्या काळात दोन वर्षे पंढरपूरच्या आषाढी वारीला खंड पडला,  वारकरी वारीसाठी आतुर झाले होते. या वर्षी  कोरोनाचे सावट दूर झाल्याने पुन्हा वारी उत्साहाने सुरू झाली. संत तुकाराम महाराजांच्या पालखी दिंडीत 90 वर्षाची अखंड परंपरा असलेल्या पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील विनायकराव गिराम यांचा अश्व सहभागी झाला.  11 जूनला निघालेल्या या अश्वाने 20 जून रोजी देहू येथून तुकोबांच्या पालखी सोबत   19 जुले रोजी शनिवारी आशाडी  एकादशी च्या एक दिवस अगोदर अश्वाने पाखली विठू रायच्या पायथ्याशी आणून सोडली. 

देहू - आळंदीहून पांडुरंगाच्या ओढीने निघालेला वारकरी जेव्हा चालून चालून थकतो तेव्हा त्याच्यात उत्साह निर्माण करणारा प्रसंग म्हणजे 'रिंगण'. या रिंगण सोहळ्यात तो मुक्तपणे टाळ मृदंगाच्या ठेक्यात नाचतो, गातो, खेळतो.  वारकरी संप्रदयायील ही अखंड परंपरा आजही कायम आहे., याच पालखीसोबत बाभळगावंचा अश्व वारकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. दोन वर्षांच्या कोरिणच्या पार्श्वभूमीवर वर वारी बंद असल्याने अश्वाची वारी ही चुकली होती. पण, यावर्षी पुन्हा वारी सोहळ्यात अश्व सहभागी झाला होता.

 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीdehuदेहूAlandiआळंदीparabhaniपरभणी