शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील मोठ्या धरणांमध्ये ९0 टक्के पाणीसाठा, पिकांची स्थितीही उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 06:54 IST

राज्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या १७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. राज्यात खरीप पिकांची स्थितीही उत्तम आहे. कोरोनाकाळात पाऊस-पाण्याचे हे चित्र राज्यासाठी दिलासादायी आहे.

- योगेश बिडवईमुंबई : वरुणराजाने यंदा महाराष्ट्रावर मोठी कृपा केली असून आॅगस्टमध्ये राज्यात सर्वदूर झालेल्या दमदार पावसाने राज्यातील ४१ मोठ्या धरणांत सरासरी ८९ टक्क्यांवर पाणीसाठा झाला आहे, असे जलसंपदा विभागाने संकलित केलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे.राज्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या १७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. राज्यात खरीप पिकांची स्थितीही उत्तम आहे. कोरोनाकाळात पाऊस-पाण्याचे हे चित्र राज्यासाठी दिलासादायी आहे.मराठवाडा : जायकवाडी ८७%मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात ८७% साठा झाला आहे. पूर्णा येलदरी धरण भरले आहे. माजलगाव (७३%), उर्ध्व पैनगंगा (९१%) धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. मांजरा धरणात मात्र ३ टक्केच पाणीसाठा झाला आहे.विदर्भ : आठ धरणांमध्ये सरासरी ८५%विदर्भातही पाऊसमान चांगले आहे. विभागातील महत्त्वाच्या आठ धरणांमध्ये सरासरी ८५ टक्के साठा झाला आहे. पेंच तोतलाडोह धरण १00% भरले आहे. उर्ध्व वर्धा (९८%), इडियाडोह (९७%) धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. गोसीखुर्द धरणात ४९ टक्के साठा झाला आहे.पश्चिम महाराष्ट्र : सात धरणे १00%पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या सर्व १९ धरणांमध्ये जवळपास ९0 टक्क्यांपेक्षा अधिक साठा झाला आहे. पानशेत, वरसगाव, खडसवासला, आंद्रा, नीरा देवघर, भाटघर आणि वीर ही धरणे १00 टक्के भरली आहेत. कोयना (९४%), वारणा (९५%) आणि भीमा-उजनी (९२%) ही धरणे लवकरच भरण्याच्या मार्गावर आहेत.उत्तर महाराष्ट्र : भंडारदरा १00 टक्केउत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे मूळा धरण ९३ टक्के भरले आहे. भंडारदरा धरण १00 टक्के भरले आहे. दारणा (९३%), गंगापूर (९४%), गिरणा (७३%), हतनूर (४४%) धरणांमध्येही साठा वाढला आहे.राज्यातील ११ धरणांतून पाण्याचा विसर्गराज्यातील ११ धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील ८ धरणांचा समावेश आहे.मुंबई : तीन तलाव १00%मोडकसागर, विहार, तुळशी हे तलाव १00 टक्के भरले आहेत. तानसा (९९%), बारवी (९५%) आणि मध्य वैतरणा (९५%) हे तलावही लवकरच भरतील, अशी स्थिती आहे.कोकण प्रदेश : पावसाचे धूमशानकोकणात यंदा पावसाचे धूमशान सुरू असून कोकण प्रदेशातील भातसा (९८%), सूर्या धामणी (१00%), वैतरणा (९४%) या प्रमुख तीन धरणांत ९0 टक्क्यांवर पाणीसाठी झाल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. 

टॅग्स :WaterपाणीMaharashtraमहाराष्ट्र