९ वर्षीय बालकाची बापाकडून हत्या

By Admin | Updated: June 30, 2014 01:52 IST2014-06-29T23:29:40+5:302014-06-30T01:52:23+5:30

शेगाव तालुक्यातील गव्हाण येथील घटना; मुलाचा मृतदेह स्वत:च्या शेतात पुरला.

9-year-old child murdered by father | ९ वर्षीय बालकाची बापाकडून हत्या

९ वर्षीय बालकाची बापाकडून हत्या

शेगाव : पती- पत्नीतील क्षुल्लक वादातून बापानेच ९ वर्षीय निरागस बालकाची गळा दाबून हत्या केल्याची घटना शेगाव तालुक्यातील गव्हाण येथे शनिवारी रात्री घडली. रविवारी सायंकाळी या मुलाचा मृतदेह शेतात आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्यास अटक केली आहे.
तालुक्यातील गव्हाण येथील रहिवासी संतोष सिरसाट व त्याची पत्नी उर्मिला यांच्यामध्ये मागील दोन वर्षापासून बेबनाव होता. उर्मिलाने तिच्या माहेरूहून आंबे आणले होते. मुलगा बुध्दभुषण याला तिने आंबा खाण्यास दिला असता, पती संतोष सिरसाट याने त्यावर आक्षेप घेतला. मात्र बुध्दभुषणने आंबा खाल्ला. त्यामुळे या बाबीचा राग धरुन शनिवारी रात्री दारुच्या नशेत संतोष सिरसाट याने झोपलेल्या मुलाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मुलाचे प्रेत पोत्यात भरून, स्वत:च्याच शेतात पुरले; मात्र मृत मुलाच्या काकाला संशय आला. त्यांनी या घटनेबाबत शेगाव ग्रामीण पोलिसांनी माहिती दिली. शेगाव पोलिसांनी घटनास्थळी जावून धुरा उकरला असता, त्यांना मुलाचे प्रेत आढळून आले. पोलिसांनी संतोष सिरसाट याला अटक केली असून, रात्री उशीरापर्यत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती.

Web Title: 9-year-old child murdered by father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.