शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

९ हजार दुष्काळी गावांना शासकीय मदत नाहीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 03:11 IST

भरपाईचा प्रस्तावही तयार नाही : राज्याच्या तिजोरीतून मदतीचे होते आश्वासन

यदु जोशीमुंबई : राज्यातील ९ हजार दुष्काळी गावांमधील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या तिजोरीतून नुकसान भरपाई देण्याच्या घोषणेचा शासनाला विसर पडल्याचे दिसत आहे. राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ १५ दिवसांवर येऊन ठेपली असतानाही मदत व पुनर्वसन विभागाने या भरपाईचा साधा प्रस्तावही तयार केलेला नाही.

राज्य शासनाने १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. या तालुक्यांतील शेतकऱ्यांना ४ हजार कोटी रुपयांची भरपाईदेखील देण्यात आली. या १५१ तालुक्यांमधील सुमारे १९ लाख शेतकºयांना भरपाई मिळाली. केंद्र सरकारच्या निकषांनुसार आणि त्यांच्याच तिजोरीतून ही मदत देण्यात आली. त्याच सुमारास २६८ मंडळे त्यानंतर १३१ गावे आणि त्यानंतर ४५०० गावे अशा जवळपास ९ हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. राज्यात एकूण २८ हजार दुष्काळी गावे आहेत. या गावांसाठी अन्य दुष्काळी गावांप्रमाणे आठ सवलतीदेखील लागू करण्यात आल्या.

या ९ हजार गावांमधील शेतकºयांना राज्याच्या तिजोरीतून भरपाई दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जूनपासून मुंबईत सुरू होत असून दुसºयाच दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यात या भरपाईची तरतूद करायची तर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय लवकरात लवकर होण्याची गरज आहे.

दिरंगाईबद्दल नाराजीमदत व पुनर्वसन विभागाच्या अधिकृत सूत्रांनी अशा मदतीचा कुठलाही प्रस्ताव तयार करण्यात आलेला नाही हे मान्य केले. ही बाब विचाराधीन आहे. या निर्णयामुळे किती अतिरिक्त भार राज्याचा तिजोरीवर येईल, याची माहिती मागविली जात आहे, असे सांगण्यात आले. भाजप-शिवसेनेच्या काही आमदारांनी ‘लोकमत’शी बोलताना या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार